34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रअमित शाह तुम्ही बाळासाहेबांच्या मंदिराचा अपमान केला -शिवसेना

अमित शाह तुम्ही बाळासाहेबांच्या मंदिराचा अपमान केला -शिवसेना

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना प्रमुख ज्या खोलीत बसत होते ती तुमच्यासाठी खोली आहे. परंतु ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. अमित शाह तुम्ही बाळासाहेबांचा आणि त्या मंदिराचा अपमान केला. असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केला.

बंद खोलीतील चर्चा सार्वजनीक करता येत नाहीत असं भाजपा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी सांगितलं होतं. आज गुरुवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्या वक्तव्याचा समाचार घेतला. राऊत हे रूग्णालयातून कालच घरी आले मात्र आज चांगलेच आक्रमक दिसले. तीन दिवसांपासून राऊत रुग्णालयात होते. काल शाहांनी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेत त्याला चांगलेच उत्तर दिले.

बंद दरवाज्या आड जी काही बोलणी झाली, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का सांगितली नाही, असा सवालही राऊत यांनी यावेळी केला. निवडणुकीदरम्यान आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतं मागितली. त्यामुळे निवडणुकीदरम्यान ठरवलेल्या गोष्टी त्यांना कळणं अपेक्षित होतं. आमचा त्यांच्याप्रती आदर आहे. बंद खोलीत ज्या गोष्टी ठरतात, त्यावर जेव्हा अंमल होत नाही त्यावेळी त्या बाहेर येतात, असंही ते म्हणाले.

शाह बुधवारी म्हणाले होते. जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून करत होतो, तेव्हा शिवसेनेनं आक्षेप का घेतला नाही, असं शाह म्हणाले होते. राऊत म्हणाले, आम्ही पंतप्रधानांचा आदर करतो आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्हाला ते करायचं नव्हतं. भाजपाला जरी त्यांचा आदर नसला तरी आम्ही त्यांचा आदर करतो. म्हणून आम्ही त्यावेळी त्यावर काही आक्षेप घेतला नाही. बंद दाराआडच्या चर्चा योग्य वेळी मोदींपर्यंत पोहोचल्या नाहीत. युती कोणत्या कारणामुळे झाली हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. आम्हाला पंतप्रधानांना खोटं पाडण्याची इच्छा नाही, असंही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी