28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयशिवसेनेचे हकालपट्टी सत्र सुरूच, पक्षविरोधी कारवाई केल्याने आणखी सात जणांवर कारवाई

शिवसेनेचे हकालपट्टी सत्र सुरूच, पक्षविरोधी कारवाई केल्याने आणखी सात जणांवर कारवाई

टीम लय भारी

बुलढाणा : शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेविरोधातच बंड पुकारल्याने राजकीय चक्रे आता वेगाने फिरू लागली आहेत. शिंदे गटात सामील होत शिवसेनेला ललकारणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेनेने हकालपट्टी करणे सुरू केले आहे. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची सुद्धा आता शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली असून आणखी सात जणांना सुद्धा त्यांच्या पदावर काढून टाकण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात येत आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून ही माहिती देण्यात आली आहे. जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदावरून खासदार प्रतापराव जाधव यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवेसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून तर  जिल्हा प्रमुख शांताराम दाणे (मलकापूर जळगांव जामोद विधानसभा) उपजिल्हा प्रमुख राजु मिरगे, उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, तालुका प्रमुख नांदुरा संतोष डीवरे, तालुका प्रमुख मलकापूर विजय साठे, तालुका प्रमुख शेगांव रामा थारकार यांनी पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी केली असल्याचे शिवसेनेने स्पष्टीकरण दिले आहे.

हे सुद्धा वाचा..

क्रिकेटपटू कृणाल पांड्याला झाले पुत्ररत्न, ठेवले ‘हे’ नाव

संविधानाचं रक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी युवांवर, रोहित पवारांचा तरुणांना सल्ला

‘उलटी काळी बाहुली, टाचण्या टोचून कुंकूवाचा लिंबू’, विद्या चव्हाणांनी सुचवले शिंदेगटाला चिन्ह

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी