32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeक्राईमभयानक : मटणाचे चोचले पुरविले नाही म्हणून मुलाने वृद्ध बापाची केली हत्या,...

भयानक : मटणाचे चोचले पुरविले नाही म्हणून मुलाने वृद्ध बापाची केली हत्या, सातारा जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

टीम लय भारी

मुंबई : परमेश्वरापेक्षाही आई – वडीलांचे स्थान प्रत्येक मुलासाठी मोठे असते. परंतु कधीकधी पोटचे मुल सुद्धा साक्षात राक्षसी वृत्तीचे असू शकते. काळजावर घाव घालणारी अशीच एक हृदयद्रावक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे (Murder in Satara district).

एका ३२ वर्षीय तरूणाने चक्क आपल्या वृद्ध पित्याचीच हत्या केली आहे. जिभीचे चोचले पुरविण्यासाठी मटण दिले जात नाही, म्हणून या कार्ट्याने आपल्या जन्मदात्या पित्यावर कोयत्याने वार केले. त्यात पित्याचे निधन झाले आहे (Son murdered to his father). शुक्रवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी ‘लय भारी’ला दिली (Police officer Santosh Tasgaonkar).

हे सुद्धा वाचा

भाजप आमदार जयकुमार गोरेंवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला दणका, आमदार जयकुमार गोरेची चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश

प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंवर तीक्ष्ण वार !

जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल

सातारा जिल्ह्यातील कासारवाडी (ता. माण) येथे हा प्रकार घडला आहे. नटराज पांडूरंग सस्ते (वय ३२) असे या नालायक तरूणाचे नाव आहे. मयत झालेल्या वडिलांचे नाव पांडूरंग बाबूराव सस्ते (वय ७०) असे आहे (Natraj Saste murder to Pandurang Saste).

पांडूरंग सस्ते हे गेल्या काही दिवसांपूर्वी यात्रेला गेले होते. यात्रेवरून परत आल्यानंतर घरात काही दिवस मटणासारखे मांसाहरी जेवण न करण्याचे घरातील मंडळींनी ठरविले होते. परंतु नटराजला मटण खाण्याची तलप व्हायची. मला मटण हवे असे सांगत नटराज याने वडिलांशी हुज्जत घातली. त्यातूनच संतापाच्या भरात नटराजने वडिलांची हत्या केल्याचे तासगावकर यांनी सांगितले (Crime at Dahiwadi, Satara).

नटराज सस्ते हा रागीट स्वभावाचा तरूण होता. घरात त्याचे वडिलांसोबत सतत खटके उडायचे. त्याचे लग्नही झालेले नव्हते. त्यांच्या घरातील वादंग पोलीस ठाण्यापर्यंत कधी पोचले नव्हते. गावातच हा वाद मिटवला जायचा, असे तासगावकर यांनी सांगितले. आरोपी नटराजला पोलिसांनी अटक केली असल्याचे सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी