23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeक्रीडाकांदिवली येथे संतोष इन्स्टिट्यूटची 17 वी वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न

कांदिवली येथे संतोष इन्स्टिट्यूटची 17 वी वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न

 

कांदिवली येथील सेंट मेरी शाळा येथे संतोष इन्स्टिट्यूटच्या 17 व्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 14 डिसेंबर 2024 या वार्षिक क्रीडा स्पर्धात वेगवेगळे खेळ ठेवले असून मोठ्या उत्सहात हा दिवस पार पडला.

 

वार्षिक क्रीडा स्पर्धा अंतर्गत कांदिवली येथील सेंट मेरी शाळा येथे संतोष इन्स्टिट्यूटचे 17 वे वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. संतोष इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ.दत्ताराम फोंडे व मुख्याध्यापिका डॉ.सुचिता फोंडे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे (president of Rotary Club). श्री विकास अग्रवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर स्वमग्न मुलांनी पिरामिड, माचपास, योगा, कवायत व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे वेलकम गाण्यावर स्वागत केले. व त्यानंतर स्वमग्न मुलांच्या क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली. स्वमग्न मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ ठेवले होते.ही मुलं शिक्षकांच्या मदतीने सामान्य माणसांसारखी खेळ खेळत होती. त्यात त्यांना वेगळाच आनंद मिळत होता. त्याचबरोबर त्यांचे पालक सुद्धा या मुलांच्या खेळासाठी उत्साह टाळ्यांच्या गजरात देत होती. अशाच प्रकारे पालकांच्यासाठी सुद्धा खेळ ठेवले होते.त्यामध्ये पालकांना एक वेगळाच आनंद मिळत होता.स्वमग्न मुलांना व त्यांच्या पालकांना खेळाच्या अंतिम बक्षिसे देण्यात आले.  (17th Annual Sports Competition of Santosh Institute concluded at Kandivali)

 

संतोष इन्स्टिट्यूट ही संस्था स्वमग्न व विकलांग मुलांसाठी काम करते.या इन्स्टिट्यूटच्या सहा शाखा मुंबईमध्ये आहेत (मिरा रोड,कांदिवली,सांताक्रुज,सीवूड,बेलापूर,डोंबिवली) या ठिकाणी शाखा असून या मुलांसाठी वस्तीगृह डे केअर स्पोर्ट्स स्विमिंग व्होकेशनल दिशा एन.आय.ओ.एस या सुविधा दिल्या जातात.

(17th Annual Sports Competition of Santosh Institute concluded at Kandivali)

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी