इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना अफगाणिस्तान अ ने जिंकला आहे. अफगाणिस्तान अ आणि श्रीलंका अ मध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला. हा सामना अफगाणिस्तान अ ने 7 गडी राखून जिंकला. अफगाणिस्तान अ संघाने प्रथमच इमर्जिंग आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. (Afghanistan won the Emerging Asia Cup 2024)
तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरने खेळाडूंना दिला ‘हा’ आदेश
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अफगाणिस्तान अ संघ हे जेतेपद पटकावेल असे कोणालाही वाटले नव्हते, मात्र संपूर्ण स्पर्धेत अफगाणिस्तानने चमकदार कामगिरी केल्यानंतर सर्वांचेच विचार बदलले. अफगाणिस्तानच्या या युवा प्रतिभांकडे पाहता त्यांच्या संघाचे भवितव्य खूप चांगले असल्याचे स्पष्ट होते. (Afghanistan won the Emerging Asia Cup 2024)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी-20 आणि एकदिवसीय संघासाठी केली नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका अ संघाने 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 133 धावा केल्या आणि अफगाणिस्तान अ संघाला विजयासाठी 134 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान अ संघाने हे लक्ष्य 18.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. अफगाणिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील हा ऐतिहासिक विजय आहे. जे येणाऱ्या काळासाठी स्मरणात राहील. (Afghanistan won the Emerging Asia Cup 2024)
इमर्जिंग आशियाचा पहिला हंगाम 2013 मध्ये खेळला गेला. ज्यामध्ये टीम इंडिया चॅम्पियन झाली. त्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या संघांनी हे विजेतेपद पटकावले आहे. इमर्जिंग आशिया कप जिंकणारा अफगाणिस्तान अ हा चौथा संघ ठरला आहे. या स्पर्धेचा हा ५वा मोसम होता. (Afghanistan won the Emerging Asia Cup 2024)
अफगाणिस्तान अ संघाने उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव केला. जो या स्पर्धेतील सर्वात मोठा संघ होता. अफगाणिस्तान अ संघ 2017 आणि 2019 मध्ये इमर्जिंग आशिया कपच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता, परंतु दोन्ही वेळा अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. यावेळी त्याने प्रथमच अंतिम फेरी गाठली आणि विजेतेपदही पटकावले. (Afghanistan won the Emerging Asia Cup 2024)