जागतिक क्रिकेटच्या इतिहासात दररोज नवीन विक्रम बनवले जातात आणि जुने रेकॉर्डस् मोडले जातात. मात्र, असे काही विक्रम आहेत जे आजपर्यंत मोडलेले नाहीत, जरी ते भविष्यात मोडले जातील. पण आज आम्ही तुम्हाला क्रिकेटच्या त्या विक्रमाची माहिती देणार आहोत, जो भविष्यात कधीही मोडू शकणार नाही आणि हा विक्रम या माजी भारतीय दिग्गजाने केला आहे. या विक्रमाची फक्त बरोबरी केली जाऊ शकते पण कधीही मोडता येत नाही. (anil kumble 10 wickets record test cricket)
श्रीलंकेला बसला मोठा धक्का, वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्याआधी ‘हा’ स्टार फलंदाज संघाबाहेर
भारतीय संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळे भारताकडून दीर्घकाळ क्रिकेट खेळला. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत कुंबळेने अनेक मोठे विक्रम केले. कुंबळे हा भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 619 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 337 बळी घेतले. त्याचबरोबर कुंबळेने एक असा विक्रमही केला होता जो भविष्यात कधीही मोडता येणार नाही. (anil kumble 10 wickets record test cricket)
4⃣0⃣3⃣ intl. games 👍
9⃣5⃣6⃣ intl. wickets 👌
Only the second bowler in Test cricket to scalp 10 wickets in an innings 👏Wishing former #TeamIndia captain @anilkumble1074 a very happy birthday. 🎂 👏
Let’s revisit his brilliant 1⃣0⃣-wicket haul against Pakistan 🎥 🔽 pic.twitter.com/BFrxNqKZsN
— BCCI (@BCCI) October 17, 2021
‘कांगारू गोलंदाजांसाठी डोकेदुखी बनणार सरफराज खान’: संजय मांजरेकर
1999 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात दिल्लीत कसोटी सामना खेळला गेला होता. अनिल कुंबळेसाठी हा सामना ऐतिहासिक कसोटी सामना होता. या सामन्याच्या एका डावात गोलंदाजी करताना अनिल कुंबळेने पाकिस्तानच्या सर्व 10 फलंदाजांना बाद केले होते. कुंबळेनंतर भारताच्या कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आलेली नाही. हा असा विक्रम आहे ज्याची फक्त बरोबरी करता येते पण मोडता येत नाही. (anil kumble 10 wickets record test cricket)
कुंबळेनंतर हा पराक्रम न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलनेही केला आहे. इजाजने एका कसोटी डावात 10 विकेट्सही घेतल्या. मात्र, हा पराक्रम पहिल्यांदा इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जिम लाकरने केला. 1956 मध्ये जिम लेकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका डावात 10 विकेट घेतल्या होत्या. (anil kumble 10 wickets record test cricket)
दिग्गज माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी भारतासाठी 132 कसोटी आणि 271 एकदिवसीय सामने खेळले. 132 कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 619 विकेट घेतल्या आणि फलंदाजी करताना 2506 धावा केल्या. याशिवाय त्याने 271 एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना 337 बळी आणि फलंदाजी करताना 938 धावा केल्या. याशिवाय कुंबळेने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1136 विकेट घेतल्या होत्या. (anil kumble 10 wickets record test cricket)