34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाArshdeep Singh : 'तो' झेल अर्शदीप सिंगला पडला महागात

Arshdeep Singh : ‘तो’ झेल अर्शदीप सिंगला पडला महागात

भारतीय टीमला दुसऱ्यावेळी पाकिस्ताने धूळ चारली त्यामुळे हे कशामुळे झाले अशा चर्चा सुरू असताना अर्शदीप सिंगने पाकिस्तानी फलंदाज आसिफ अली याचा झेल सोडल्यामुळे असे झाले असे म्हणत सोशलमीडियावर काही चाहत्यांनी टिकेचा भडिमार सुरू केला.

दुबईत सध्या आशिया चषक 2022 चा खेळ चांगलाच रंगला आहे. कोण यंदा बाजी मारणार म्हणून सगळेच जण या खेळाकडे डोळे लावून बसले आहेत. दरम्यान आज या स्पर्धेत भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यात आज सामना रंगणार आहे, त्यामुळे आज भारतासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून पुढे सरकण्यासाठी आजच्या खेळात काहीही करून बाजी मारावी लागणार आहे. सामन्याच्या सुरवातीलाच पाकिस्तानला धूळ चारत भारताने सुपर चारच्या खेळात दमदार सुरूवात केली होती मात्र भारतीय संघातील युवा खेळाडू अर्शदीप सिंग याच्या हातून पाकिस्तानी फलंदाज आसिफ अली याचा झेल सुटला आणि हाच झेल पराभवास कारणीभूत ठरला. या झेलमुळे अर्शदीप सिंगला नेटकऱ्यांच्या टिकेला सामोरे जावे लागत आहे.

भारतीय टीमला दुसऱ्यावेळी पाकिस्ताने धूळ चारली त्यामुळे हे कशामुळे झाले अशा चर्चा सुरू असताना अर्शदीप सिंगने पाकिस्तानी फलंदाज आसिफ अली याचा झेल सोडल्यामुळे असे झाले असे म्हणत सोशलमीडियावर काही चाहत्यांनी टिकेचा भडिमार सुरू केला. यावर अर्शदीपची बाजू सावरण्यासाठी त्याचे चाहते, आजी – माजी खेळाडू पुढे सरसावले परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान ही टीका इतकी पुढे गेली त्यातून त्याचा संबंध खलिस्तानी म्हणून जोडण्यात आला, त्यानंतर मात्र न राहवून अर्शदीप सिंगच्या आईवडिलांनी मौन सोडले आणि त्याची बाजू राखण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा…

Navneet Rana : तु ठाकरे है, तो मै राणा हूँ !

Mission Baramati : ‘स्वत:ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे…’

Eknath Shinde : जयंत पाटलांचे मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदेना पत्र

Arshdeep Singh : 'तो' झेल अर्शदीप सिंगला पडला महागात

ज्या वेळी दुसरा भारत – पाक सामना सुरू होता त्यावेळी अर्शदीपचे वडील दर्शन सिंग हे दुबईच्या स्टेडिअममधून मॅच पाहत होते. सोशल मीडियावरील ट्रोलिंग करणाऱ्यांना करारा जवाब देत ते म्हणाले, आपल्या मुलाच्या बाबतीत असं काही घडत असेल असं पालक म्हणून त्यांच पालक म्हणून वाईट वाटणं नक्कीच स्वाभाविक आहे. तो केवळ २३ वर्षांचा आहे, त्याला ट्रोल करण्यात आलं. त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही कारण तुम्ही सगळ्यांची तोंड बंद करू शकत नाही, असे म्हणून दर्शन सिंग यांनी नाराजी व्यक्त केली.

दर्शन सिंग पुढे म्हणाले, चाहते जर नसतील तर खेळाला मजाच येत नाही. काही चाहते असे असतात जे काहीही झालं तरी तुमची साथ सोडत नाहीत. पण दुसरीकडे असाही चाहतावर्ग असतो जो एक पराभव देखील पचवू शकत नाहीत. पण साऱ्यांनीच हे लक्षात घेतलं पाहिजे की, विजय दोघांपैकी एकाच कोणाचा तरी होतो असे म्हणून यावेळी मुलाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. आता भारताला स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे आव्हान पार पाडावे लागणार आहे. हे दोन्ही सामने जिंकले तरच भारताला अंतिम फेरी गाठता येणार आहे त्यामुळे भारतीय संघ हे आव्हान कसं पेलणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी