30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2022: भारताला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेविरूद्ध जिंकणे अंत्यत निकडीचे

Asia Cup 2022: भारताला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेविरूद्ध जिंकणे अंत्यत निकडीचे

आशिया कप स्पर्धेतील (Asia Cup 2022) ‘सुपर ४’ गटातील दुसऱ्या सामन्यामध्ये आज भारत (India) आणि श्रीलंकेची (Srilanka) लढत होणार आहे. भारताला ‘सुपर ४’ (Super 4) गटातील पहिला सामन्यामध्ये रविवारी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आजच्या सामन्यात भारताला श्रीलंकेशी जिंकणे खूप महत्त्वाचे आहे.

आशिया कप स्पर्धेतील (Asia Cup 2022) ‘सुपर ४’ गटातील दुसऱ्या सामन्यामध्ये आज भारत (India) आणि श्रीलंकेची (Sri Lanka) लढत होणार आहे. भारताला ‘सुपर ४’  (Super 4) गटातील पहिला सामन्यामध्ये रविवारी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आजच्या सामन्यात भारताला श्रीलंकेशी जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. भारताने साखळी फेरीत पाकिस्तान आणि हाँगकाँगला नमवून ‘सुपर ४’ गटात प्रवेश केला. सुपर ४’ गटाच्या पहिल्या सामन्यात भारताचा पाकिस्तानशी पराभव झाल्याने आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघ व्यवस्थापन काही महत्त्वपूर्ण बदल करण्याची संभावना आहे.

पाकिस्तान विरूद्धच्या भारताचा विकेटकीपर-फंलदाज रीषभ पंत बेजबाबदार शॉट मारून बाद झाल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. आजच्या सामन्यात त्याच्या जागी भारतीय संघ व्यवस्थापन अनुभवी विकेटकीपर-फंलदाज दिनेश  कार्तिकचा समावेश करण्याची दाट शक्यता आहे.

रविंद्र जाडेजा जायबंदी झाल्याने उर्वरित सामन्यांसाठी त्याच्या जागी अक्षर पटेल याची वर्णी लागली. आजच्या सामन्यात फंलदाज दीपक हुडाला वगळून अष्टपैलु खेळाडू अक्षर पटेलचा संघामध्ये समावेश होऊ शकतो.

भारताच्या फंलदाजीची भिस्त रोहित शर्मा, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडया आणि फॉर्म गवसलेल्या विराट कोहलीवर असेल. गोलंदाजीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आजचा सामना जिंकण्यासाठी भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि युझवेन्द्र चहल यांना टिच्चून मारा करावा लागेल जेणेकरून श्रीलंकेच्या फंलदाजाना कमीत कमीत धावांमध्ये रोखता येईल.

हे सुद्धा वाचा –

Navneet Rana : नवनीत राणांना ‘तोंड सांभाळण्याचा’‍ शिवसेनेचा इशारा

Congress: काँग्रेसचा प्रकाश आंबेडकरांना धक्का!‍

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंवर राग काढण्यासाठी एकनाथ शिंदेंनी केले गोरगरीबांचे वाटोळे

भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या शेवटच्या २५ टी-२० सामन्यांमध्ये भारताने १७ सामन्यात व श्रीलंकेने ७ सामन्यामध्ये विजय संपादन केला आणि एक सामना अनिर्णित राहिला.

जर आजच्या सामन्याची खेळपटटी आणि हवामानाचा विचार केला तर, जो कर्णधार नाणेफेक जिंकेल तो प्रथम क्षेत्ररक्षण करण्यास प्राधान्य देईल. ‍क्रिकेट समीक्षकांच्या मतानुसार, या स्पर्धेतील अगोदर झालेल्या सामन्यांप्रमाणे हया सामन्यात देखील दोन्ही संघ मोठी धावसंख्या उभारण्याची शक्यता आहे.

भारताकडून खेळणाऱ्या ११ संभावित खेळाडूंची यादी – रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडया, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि युझवेन्द्र चहल.

श्रीलंकेकडून खेळणाऱ्या ११ संभावित खेळाडूंची यादी – पथुम निसांका, डी. गुणाधिलका, सी. असलंका, बी. राजपक्षा, डी. शनाका (कर्णधार), डब्लू. हसरंगा, सी. करूणारत्ने, के. मेंडीस, एम. थीक्षणा, डी. मदुशंका आणि एम. फर्नांडो.

आजचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी स्टार स्पोर्टस नेटवर्कवर प्रक्षेपित होईल.

आमचे युट्युब चॅनेल सुद्धा सबस्क्राईब करा –

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी