27 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरक्रीडाAsia Cup 2022 : भारत - पाकिस्तानच्या सामन्यात आता नवा 'ट्विस्ट', भारतीय...

Asia Cup 2022 : भारत – पाकिस्तानच्या सामन्यात आता नवा ‘ट्विस्ट’, भारतीय संघात मोठे बदल

या खेळात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही संघात अटीतटीचा आता सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर भारतीय संघात चार महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे भारतीय टीमची यावेळी खेळी वेगळी असू शकते. भारत आणि पाकिस्तान हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्याने दोन्ही टीमचा यावेळी चांगलाच कस लागणार आहे. 

यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत सगळ्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची उत्सुकता लागली आहे. दोन्ही देशाचे नागरिक कोणता संघ जिंकणार म्हणून या सामन्याची वाट पाहत आहेत. हा खेळ तसा दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे कारण प्रत्येकाचीच प्रतिष्ठा दावणीला लागलेली आहे, त्यामुळे या खेळात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही संघात अटीतटीचा आता सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर भारतीय संघात चार महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे भारतीय टीमची यावेळी खेळी वेगळी असू शकते. भारत आणि पाकिस्तान हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्याने दोन्ही टीमचा यावेळी चांगलाच कस लागणार आहे.

भारतीय टीममध्ये चार महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यातील पहिला बदल म्हणजे यावेळी सामन्यात तीन फिरकी गोलंदाज उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाच्या या खेळीत भारतीय टीमकडून अष्टपैलू खेळाडूंना सामना राखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खेळातील पहिला बदल म्हणजे रवींद्र जडेजाला यात उतरवण्यात येणार आहे. जडेजाचे वैशिष्ट्य असे की तो अचूक आणि भेदक गोलंदाजी करतो, त्यामुळे हा पर्याय नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

यातील दुसरा बदल म्हणजे फिरकी गोलंदाजीचाच सांगण्यात येत आहे. रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन यांचे स्थान या सामन्यासाठी निश्चित असले तरीही यात तिसरा गोलंदाज सुद्धा सामील होणार आहे. संघातील तिसरा फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या रुपात हा सामना आणखी दमदार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चहल ने २०-२० मध्ये चांगली कामगिरी केली होती आणि हेच लक्षात घेता चहलला यावेळी संधी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

Fraud Case : ‘हॅलो, हाय ब्रो…मी आदित्य ठाकरे’ तोतया व्यक्तीकडून फसवणूकीचा प्रयत्न

Noida Twin Towers : आणि… 32 मजली टाॅवर काही क्षणांत जमिनदोस्त!

Ganeshotsav 2022 : ‘सत्ताधाऱ्यांचे समुद्रमंथन आणि कार्यकर्त्यांचे मरण’, आणखी एक वादग्रस्त देखावा

यावेळी सलामीच्या स्थानातील बदल हा तिसरा बदल मानण्यात येत आहे. मागच्या वेळी काही मालिका खेळांमध्ये इशान किशन हा सातत्याने रोहित शर्माबरोबर सलामीसाठी येत होता, परंतु या संघात इशानची निवड न झाल्याने यावेळी रोहितसोबत लोकेश राहुलला ही संधी देण्यात येणार आहे. दरम्यान तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार यावर चौथा बदल करण्यात येणार आहे. याआधी श्रेअस अय्यर तिसऱ्या स्थानावर खेळण्यासाठी येत असे परंतु यावेळी त्याचा या संघात समावेश न केल्यामुळे त्याच्या जागी विराट कोहली यास संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघातील या महत्त्वपूर्ण चार बदलामुळे यावेळी खेळाची दिशा थोडी बदलेली दिसणार आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण बदलानंतर यंदा टीम इंडिया बाजी मारणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी