30 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरक्रीडाAsia Cup 2022 : आशिया चषकासाठी टीम इंडियाची खास जर्सी! ३ स्टार्सचे...

Asia Cup 2022 : आशिया चषकासाठी टीम इंडियाची खास जर्सी! ३ स्टार्सचे विशेष महत्व जाणून घ्या एका क्लिकवर

सर्व जगभरात सध्या आशिया चषकाचे (Asia cup 2022) वारे वाहत आहेत. प्रत्येक जण २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी उत्सुक आहे. अशा परिस्थितीत आशिया चषक सुरू होण्याच्या केवळ १ दिवस आधी म्हणजेच शुक्रवार (२६ ऑगस्ट) रोजी टीम इंडियाने (Indian cricket team) आशिया चषकासाठीच्या जर्सीचे (New indian jearsy) अनावरण केले. बीसीसीआयच्या ट्विटर अकाउंटवरून याबाबतचा एक व्हिडिओ शे्अर करण्यात आला आहे. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) अनेक भारतीय खेळाडू भारताची नवी जर्सी घालून फोटोशूट करताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने (Ravindra jadeja) देखील या नव्या-कोऱ्या जर्सी सोबतचा एक फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. जडेजा व्यतिरिक्त अजूनपर्यंत कोणत्याही खेळाडूने या जर्सीसोबतचा फोटो अद्याप शेअर केलेला नाही.

जर्सीवरील स्टारचे विशेष महत्व

भारताच्या या नव्या जर्सीवर बीसीसीआयच्या चिन्हाच्या वरच्या बाजूला तीन स्टार दिसत आहेत. या स्टारचं एक विशेष महत्व आहे. आजवर टीम इंडियाने क्रिकेट इतिहासातील ३ विश्वचषक आपल्या नावावर केले आहेत. या विजयी विश्वचषकांचा संख्या म्हणून जर्सीवर हे ३ स्टार दिले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय या स्टार्समुळे टीम इंडियाची जर्सी आणखी उठून दिसत असल्याची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटत आहे.

हे सुद्धा वाचा

Badminton World Championship : बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची कमाल, नवा इतिहास रचण्याची शक्यचा

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी संपेनात, निवडणूक पत्रावरून होणार चौकशी

Ganeshotsav 2022 : बाप्पाची पूजा करा ‘या’ शुभ मुहूर्तावर

महामुकाबल्यासाठी टीम इंडिया सज्ज

आशिया चषकाची सुरुवात शनिवारी (२७ ऑगस्ट)रोजी होणार असली, तरी सर्व क्रिकेटचाहते २८ ऑगस्ट (रविवारी) होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या क्रिकेट मधील सर्वात मोठ्या लढतीसाठी उत्सुक आहेत. याआधी भारत आणि पाकिस्तान हे संघ २०२१ साली झालेल्या टी-२० विश्वचषकात आमने-सामने आले होते. त्यावेळी पाकिस्तानी संघाने भारताला पराभूत केले होते. आता जवळपास ९ महिन्यांनंतर पुन्हा या दोन संघात खडाजंगी रंगणार आहे. शिवाय २०२१ मध्ये मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ पुर्णपणे सज्ज असल्याचे दिसत आहे. यासाठी सामन्याच्या २ दिवस आधीच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह इतर खेळाडूंनी आपल्या सरावाला सुरुवात केली. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत असलेला विराट कोहली विशेष सराव करताना दिसला. या सरावादरम्यान त्याची लय परत्याल्याचे अनेक क्रिकेट दिग्गज आणि जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या रविवारी होणाऱ्या क्रिकेटच्या महामुकाबल्यात टीम इंडिया आपले वर्चस्व राखेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी