23 C
Mumbai
Friday, January 24, 2025
Homeक्रीडाबॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाने केली मोठी घोषणा

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाने केली मोठी घोषणा

बोर्डाने आपले मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांचा करार एक वर्षासाठी वाढवला आहे. (australia cricket board extended contract of head coach andrew mcdonald)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे, ज्यासाठी भारतीय संघ नोव्हेंबरच्या मध्यात ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. मात्र, याआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने एक मोठी घोषणा केली आहे. बोर्डाने आपले मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांचा करार एक वर्षासाठी वाढवला आहे. (australia cricket board extended contract of head coach andrew mcdonald)

केएल राहुलने स्वतः सोडला लखनौ सुपर जायंट्स संघ, जाणून घ्या कारण

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांना 2022 ते 2026 पर्यंत मुख्य प्रशिक्षक बनवले होते. पण आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. अँड्र्यू मॅकडोनाल्ड हे 2027 पर्यंत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक राहतील. बोर्डाने त्याचा करार एक वर्षासाठी वाढवला आहे. ते आगामी T20 विश्वचषक 2026 आणि एकदिवसीय विश्वचषक 2027 पर्यंत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.(australia cricket board extended contract of head coach andrew mcdonald)

ऑस्ट्रलियाच्या ‘या’ खेळाडूने अचानक केली निवृत्ती घोषणा

सध्या ऑस्ट्रलियाचे लक्ष बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेच्या यजमानपदासाठी सज्ज आहे. यापूर्वी भारताने याचे आयोजन केले होते. ही मालिका जिंकून दोन्ही देशांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आपला दावा मजबूत करायचा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतासाठी ही मालिका जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. (australia cricket board extended contract of head coach andrew mcdonald)

अँड्र्यू मॅकडोनाल्डने ऑस्ट्रेलियासाठी फक्त 4 कसोटी सामने खेळले आहेत. पण त्याने देशांतर्गत स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. अँड्र्यूने 4 कसोटी सामन्यात 21.40 च्या सरासरीने 107 धावा केल्या. त्याच्या नावावर फक्त 1 अर्धशतक आहे. (australia cricket board extended contract of head coach andrew mcdonald)

मात्र, 95 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 39.54 च्या सरासरीने 4825 धावा केल्या आहेत. लिस्ट ए मध्ये 100 सामने खेळताना त्याने 29.96 च्या सरासरीने 1888 धावा केल्या आहेत. 93 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 31.69 च्या सरासरीने 1743 धावा केल्या आहेत. (australia cricket board extended contract of head coach andrew mcdonald)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी