30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeक्रीडाBadminton World Championship : बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची कमाल, नवा इतिहास रचण्याची...

Badminton World Championship : बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची कमाल, नवा इतिहास रचण्याची शक्यचा

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील दुहेरीत हे दुसरे पदक मिळाले असून याआधी 2011 मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने महिला दुहेरीत पदक जिंकले होते. दरम्यान, एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला ही दुहेरी जोडी मोहम्मद अहसान आणि हेंद्रा सेटियावान या तीन वेळा सुवर्णपदक विजेत्यांकडून पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याने त्यांचा विजयी मोहिमेला ब्रेक लागला.

भारताचे अनेक गुणी खेळाडू वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून अवघ्या जगाला आपले कौशल्य दाखवून आपल्या देशाची मान उंचावत असतात. यावेळी सुद्धा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरूष दुहेरी जोडीने आपली उत्कृष्ट खेळी खेळत विजयी घौडदौड सुरू केली आहे, त्यामुळे ही जोडगोळी सुवर्णपदकाला गवसणी घालणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सात्विकसाईराज आणि चिराग या जोडीने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणारे जपानी जोडी ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांचा पराभव केल्याने त्यांनी पहिले पदक निश्चित केले असून या पहिल्या दुहेरी भारतीय जोडीने बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत सरळ धडक मारली आहे.

सात्विकसाईराज आणि चिराग या पुरूष दुहेरी जोडीचा जागतिक क्रमवारीत सातवा नंबर लागतो. या जोडीने या महिन्याच्या सुरवातीला पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते आणि आता सुद्धा दमदार खेळीने बलाढ्य जपानी जोडीला 24-22, 15-21, 21-14 अशा गुणांच्या फरकाने पराभूत केले आहे. पहिल्या खेळीत यश संपादन केल्यानंतर प्रथमच जागतिक चॅम्पियनशिपमध्ये या पहिल्या भारतीय जोडीने पद निश्चित केले आहे.

हे सुद्धा वाचा…

Ashtavinayak Darshan : अष्टविनायक दर्शन- चौथा गणपती’ रांजणगाव’चा महागणपती

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी संपेनात, निवडणूक पत्रावरून होणार चौकशी

BMC Election 2022 : मनसेने महानगरपालिका निवडणुकीसाठी कसली कंबर

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील दुहेरीत हे दुसरे पदक मिळाले असून याआधी 2011 मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने महिला दुहेरीत पदक जिंकले होते. दरम्यान, एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला ही दुहेरी जोडी मोहम्मद अहसान आणि हेंद्रा सेटियावान या तीन वेळा सुवर्णपदक विजेत्यांकडून पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याने त्यांचा विजयी मोहिमेला ब्रेक लागला.

भारतीय जोडीला याआधी तिसऱ्या मानांकित इंडोनेशियन जोडीकडून 30 मिनिटांत 8 -21, 14-21 असा पराभव पत्करावा लागला, तर आठव्या मानांकित डेन्मार्कच्या किम एस्ट्रुप आणि अँडर्स स्कार्प रासमुसेन यांचा दुसऱ्या फेरीत पराभव केला होता त्यामुळे सुद्धा भारताचे पदक हुकले होते, त्यामुळे आतातरी सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी सुवर्णपदकावर नाव कोरतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी