भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची कसोटी मालिकेत पराभव झाला. या पराभवामुळे भारतीय संघाचे मनोबल पूर्णपणे खचले आहे. आता भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यामध्ये 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे पाच सामने खेळले जाणार आहे. (border gavaskar trophy india be able to hattrick of wins in australia replied shikhar dhawan)
IPL 2025: ऋषभ पंत होऊ शकतो केकेआरचा नवा कर्णधार
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. ही मालिका भारतासाठी सोपी जाणार नाही कारण न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर संघाचे मनोबल खचले आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी भारताला आपल्या खेळात अव्वल रहावे लागेल, अशी कबुली खुद्द कर्णधार रोहित शर्मानेही दिली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनला संघाच्या मालिका जिंकण्याच्या शक्यतांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याचे त्याने उत्तर दिले. (border gavaskar trophy india be able to hattrick of wins in australia replied shikhar dhawan)
वसीम अक्रमने भारतीय संघाला केली पाकिस्तानात येण्याची विनवणी
शिखर धवन म्हणाले, ‘मला विश्वास आहे की ऑस्ट्रेलियात विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याची आमच्याकडे मोठी संधी आहे. गेल्या दोन मालिकांमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली आहे. मला खात्री आहे की संघ सकारात्मकता आणि विजयी मानसिकतेने ऑस्ट्रेलियाला जाईल. रोहित शर्मा, विराट कोहली आणि अगदी जसप्रीत बुमराह यांनी ऑस्ट्रेलियात बरेच सामने खेळले आहेत आणि ते त्यांचे अनुभव युवा खेळाडूंसोबत शेअर करतील. ही नवीन पिढी आत्मविश्वासपूर्ण, प्रेरित आणि कामगिरी करण्यास उत्सुक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला झपाट्याने प्रस्तुत केले आहे, जे आम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये खूप फायदेशीर ठरेल. वेग हे नेहमीच आव्हान असते, पण आमचे फलंदाज त्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज असतात. (border gavaskar trophy india be able to hattrick of wins in australia replied shikhar dhawan)
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा दबदबा दिसून आला. गेल्या चार मालिकांमध्ये कांगारू संघाचा पराभव करण्यात भारताला यश आले यावरून भारताच्या वर्चस्वाचा अंदाज लावता येतो. यामध्ये 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करणे देखील समाविष्ट आहे. (border gavaskar trophy india be able to hattrick of wins in australia replied shikhar dhawan)
भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 10 वेळा जिंकली आहे, तर कांगारू संघ फक्त पाच वेळाच जिंकू शकला आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत भारताचा शेवटचा पराभव 2014 मध्ये केला होता, तर 2004-05 मध्ये भारतीय भूमीवर विजय मिळवला होता. (border gavaskar trophy india be able to hattrick of wins in australia replied shikhar dhawan)