भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्षाच्या अखेरीस कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन्ही संघ तयारी करत आहेत. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू कॅमेरून ग्रीनच्या खेळाबाबत साशंकता आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला दुखापत झाली होती. यानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. (cameron green likely to skip border gavaskar trophy)
IND vs BAN: दुसऱ्या T20 सामन्यापूर्वी या अनुभवी खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा
कॅमेरून ग्रीनची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळण्याची शक्यता कमी वाटते. क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, त्याच्या पाठीवर लवकरच शस्त्रक्रिया होऊ शकते. या दुखापतीमुळे तो बऱ्याच दिवसांपासून त्रस्त होता. मिळालेल्या माहितीनुसार, कॅमेरून यांच्यासमोर शस्त्रक्रिया हाच पर्याय उरला आहे. सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाची वैद्यकीय आणि उच्च कामगिरी टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. (cameron green likely to skip border gavaskar trophy)
IND vs BAN: दुसऱ्या T20 सामन्यासाठी असा असू शकतो भारतीय संघाचा प्लेइंग इलेव्हन
सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली गेली. या मालिकेतील पहिले दोन सामने खेळल्यानंतर त्याला पाठीचा त्रास झाला होता. यानंतर तो ऑस्ट्रेलियात परतला. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाची वैद्यकीय आणि उच्च कामगिरी टीम त्याच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करत आहे. (cameron green likely to skip border gavaskar trophy)
वैद्यकीय आणि उच्च कामगिरी टीम कॅमेरॉन ग्रीनला शस्त्रक्रियेशिवाय बरे करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आता तसे होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यास तो कसोटी मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. (cameron green likely to skip border gavaskar trophy)
कॅमेरून ग्रीन या मालिकेतून बाहेर पडल्यास ऑस्ट्रेलियालाही आपले नियोजन बदलावे लागेल. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी क्रमवारीत सध्या चौथ्या क्रमांकावर असलेल्या कॅमेरून ग्रीनकडे आहे. अशा परिस्थितीत तो बाद झाला तर स्मिथ या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. यानंतर ऑस्ट्रेलियाला नव्या सलामीच्या फलंदाजाचा शोध घ्यावा लागणार आहे. (cameron green likely to skip border gavaskar trophy)