23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeक्रीडाचॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, या तारखेला भिडतील भारत-पाकिस्तान 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, या तारखेला भिडतील भारत-पाकिस्तान 

भारतीय संघाला अ गटात ठेवण्यात आले असून पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याशी खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना ब गटात स्थान देण्यात आले आहे. (champions trophy 2025 full schedule announced)

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरुवात 19 फेब्रुवारीपासून होणार असून शेवटचा सामना 9 मार्च रोजी होणार आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे  आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. भारतीय संघाला अ गटात ठेवण्यात आले असून पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याशी खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना ब गटात स्थान देण्यात आले आहे. (champions trophy 2025 full schedule announced)

शुभमन गिलच्या कामगिरीवर रिकी पाँटिंगने दिले वक्तव्य, म्हणाले- स्वतःवर विश्वास ठेवा…

बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानला पाठविण्यास नकार दिला. यांनतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन हायब्रीड मॉडेलमध्ये करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. (champions trophy 2025 full schedule announced)

बेन स्टोक्स 3 महिन्यांसाठी राष्ट्रीय संघाबाहेर, जाणून घ्या कारण

भारतीय संघ दुबईत आपले सर्व सामने हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळणार आहे. जर भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरली तर जेतेपदाचा सामना दुबईत होणार आहे. जर रोहितची सेना अंतिम फेरीत पोहोचली नाही, तर अशा परिस्थितीत स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल. (champions trophy 2025 full schedule announced)

भारतीय संघ 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यानंतर 23 फेब्रुवारीला दुबईच्या मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यातील महान सामना रंगणार आहे. पाकिस्तानचा सामना केल्यानंतर टीम इंडिया 2 मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे. जर भारतीय संघ गट टप्प्यात दमदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर रोहितची सेना दुबईत 4 मार्च रोजी या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खेळेल. (champions trophy 2025 full schedule announced)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी