31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरक्रीडाIAS Chandrakant Dalvi: चंद्रकांत दळवी यांची महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड

IAS Chandrakant Dalvi: चंद्रकांत दळवी यांची महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन, मुंबई या संस्थेच्या उपाध्यक्षपदी पुण्याचे निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल चंद्रकात दळवी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन, मुंबई या संस्थेच्या उपाध्यक्षपदी पुण्याचे निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल चंद्रकात दळवी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्रामध्ये लॉन टेनिस या खेळाच्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय क्रिडास्पर्धा या क्रीडासंस्थे मार्फत भरविल्या जातात. लॉन टेनिस या खेळाचा महाराष्ट्र राज्यभर प्रचार प्रसार व्हावा म्हणून ही संस्था विविध उपक्रम राबवित असते.
चंद्रकांत दळवी हे नामांकित खेळाडू असून कॉलेज जीवनात ते व्हॉलीबॉल संघाचे विद्यापीठाचे कर्णधार होते. ते उत्तम बॅडमिंटन आणि लॉन टेनिस खेळाडू आहे. डेक्कन जिमखाना पुणे येथे ते नियमितपणे लॉन टेनिस खेळातात. महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल क्रिडा संघटनेचे ते सल्लागारही आहेत.

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन ही महाराष्ट्रातील टेनिस खेळाची एकमेव नियंत्रक आणि प्रशासकीय संस्था आहे. ही सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणीकृत आहे. तिचे सदस्य, मतदान हक्क, विविध क्लब आणि जिल्हा टेनिस संघटना आहेत. यात मतदानाचा हक्क नसलेले सदस्य, कॉर्पोरेट संस्था, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ किंवा सरकार किंवा निमशासकीय मान्यताप्राप्त संस्था यांची कोणतीही सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत दळवी यांची निवड झाली आहे.

हे सुध्दा वाचा

इंडोनेशिया भुकंपाने हादरले; 46 जणांचा मृत्यू

ठाकरेंचे आणखी तीन खासदार, आठ आमदार शिंदे गटात येणार!; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा दावा

Dharavi Bank: गुन्हेगारीत भिजलेल्या धारावीचं रहस्य उलगडणार! सुनील शेट्टीची पहिली वेब सिरीज रिलीज

चंद्रकात दळवी यांची भारतीय प्रशासकीय सेवेत असताना उत्तम प्रशासक अशी ओळख राहीलेली आहे. त्यांच्या कामाच्या शिस्तीमुळे त्यांना मॅनेजमेंट गुरू देखील म्हटले जाते. प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी राबवलेले झीरो पेंडन्सी धोरण हे त्यांच्या उत्तम प्रशासकीय धोरणांपैकी एक, त्याच बरोबर ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियानात देखील त्यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण ठरले आहे. ग्रामीण भागासोबत त्यांची नाळ कायमच जोडलेली आहे. त्यांच्या निढळ गावात त्यांनी विविध उपक्रम राबविले, ग्रामस्वच्छता अभियानात देखील त्यांचे निढळ गावाला पारितोषिक मिळाले होते. त्यांनी गावात राबविलेल्या पाणलोट आणि जलसंधारणांच्या कामांमुळे गावचा कायापालट झाला, कायम दुष्काळी असलेले गाव सुजलाम सुफलाम झाले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!