क्रीडा

Virat Kohli : अजूनही माझ्यात‍ क्रिकेट बाकी; ७१ वे शतक झळकल्यानंतर‍ विराट कोहलीचं वक्तव्य

आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील (Asia Cup 2022) गुरूवारचा दिवस भारतीय क्रिकेट रसिकांसाठी आनंददायी ठरला. भारताला आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळाले नसले तरी भारताचा पूर्व कर्णधार आणि धडाकेबाज फंलदाज विराट कोहलीने (Virat Kohli) अफगाणिस्तान (Afghanistan) संघाविरूद्ध ‘सुपर ४’ गटाच्या शेवटच्या लढतीत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ७१ वे शतक झळकावले. कोहलीच्या तब्बल तीन वर्षांनंतर शतक झळकावल्यामुळे क्रिकेट रसिकांच्या जीवात जीव आला. कोहलीने भारतीय डावाच्या १९ व्या षटकात शतक झळकावल्यानंतर त्याने नेहमीच्या आक्रमक शैलीत जल्लोष न करता त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान आणि स्मितहास्य होते.

कोहलीने आपल्या अफगाणिस्तानच्या विरूद्धच्या तूफानी खेळीत ६१ चेंडूमध्ये १२२ धावा केल्या. कोहलीने आपले शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये बांग्लादेशविरूद्धच्या कसोटी सामन्यात केले होते.

कोहलीने आशिया कप क्रिकेट स्पर्धा सुरू होण्याआधी ६ आवडण्यांची विश्रांती घेतली होती. त्याने शतक झळकावल्यानंतर भारतीय संघाचा पूर्ण ड्रेसिंग रूमने त्याच्या खेळीचे कौतुक केले. विराट कोहलीने ७१ वे शतक झळकावून ऑस्ट्रेलियाचा पूर्व कर्णधार आणि फंलदाज रिकी पॉन्टिंगच्या सहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. भारतीय संघाचा पूर्व कर्णधार आणि धडाकेबाज फंलदाज सचिन तेंडुलकर १०० शतक झळकावून सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत प्रथम स्थानावर आहेत.

Inspirational Story: ऑक्सफर्ड मधून पासआउट झालेल्या मराठमोठया तरूणीने शेयर केला आजोबांचा प्रेरणादायी प्रवास

Queen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ यांच्या पार्थ‍िवावर 10 दिवसांनी होणार अंत्यसंस्कार

Chandrashekhar Bavankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उंटाच्या पार्श्वभागाला मुका घेण्याचा प्रयत्न…

सामना संपल्यानंतर कोहली आणि भुवनेश्वर कुमार ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होते तेव्हा कोहली कुमारला हसत उद्देशून म्हणाला की, अभी क्रिकेट है बाकी (अजूनही माझ्यात क्रिकेट बाकी आहे).

आपले ७१ वे शतक झळकावल्यानंतर कोहलीने सोशल मीडीयावर भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांचे आभार मानले. तो म्हणाला की, आशिया कप क्रिकेट स्पर्धेत आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार. आम्ही येत्या काळात आमच्या खेळात सुधारणा कर‍ू आणि पुन्हा संपूर्ण उत्साहाने पुरागमन करू.

विराट कोहली (१२२) आणि के. एल. राहुल (६२) यांनी केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तान पुढे २० षटकांत २१२ धावा केल्या आणि अफगाणिस्तान संघापुढे २१३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले.

अफगाणिस्तान संघाने दुसऱ्या डावात २० षटकात केवळ १११ धावा केल्या. अफगाणिस्तान संघाकडून इ्ब्राहिम झरदानने ६४ आणि मुजीब-उर-रहमानने १८ धावा केल्या. भारतीय गोलंदाजामध्ये भुवनेश्वर कुमारने ४ धावांच्या मोबदल्यात ५ गडी बाद केले. दीपक हुडाने व अर्शदीप सिंहने प्रत्येकी एक गडी बाद केले.

कोहली मागील ३ वर्षांपासून त्याच्या लौकिकाला साजेशी अशी फंलदाजी करत नसल्यामुळे चाहते खूप काळापासून त्याच्याकडून चांगल्या खेळीशी अपेक्षा करत होते. सामना संपल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना कोहली म्हणाला की, मी माझे हे शतक माझी पत्नी अनुष्का (शर्मा) आणि मुलगी वमिकाला समर्पित केले. मी सहा आठवडयांचा ब्रेक घेतल्यानंतर मला रिफ्रेश वाटत आहे. आमचा खेळामध्ये खेळांडूना सातत्याने विश्रांती घेण्याची मुभा मिळत नाही. परंतु आता मला कळाले की एका खेळाडूने त्याच्या कारकीर्दीत नियमित अंतराने विश्रांती घेणे किती महत्त्वाचे आहे.

अश्विन शेश्वरे

He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

21 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

21 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

22 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

22 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

23 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago