29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाCricket News : बाबो! वनडे सामन्यांत 277 धावा; धोनीच्या शिलेदारानं एकाच खेळीत...

Cricket News : बाबो! वनडे सामन्यांत 277 धावा; धोनीच्या शिलेदारानं एकाच खेळीत मोडले अनेक विक्रम

तामिळनाडूचा यष्टिरक्षक फलंदाज एन. जगदीशनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये विक्रम केला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग पाच शतके झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

तामिळनाडूचा यष्टिरक्षक फलंदाज एन. जगदीशनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये विक्रम केला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग पाच शतके झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने सोमवारी (21 नोव्हेंबर) अरुणाचल प्रदेशविरुद्ध शतक झळकावताच ही कामगिरी केली. बंगळुरू येथे झालेल्या विजय हजारे ट्रॉफीदरम्यान त्याने हा विक्रम केला. चेन्नई सुपर किंग्सने यावेळी लिलावापूर्वी जगदीशनला सोडले आहे. पण जगदीशनने आपल्या खेळाने संघ व्यवस्थापनाला विचार करायला भाग पाडले. या खेळाडूने 277 धावांची खेळी खेळली. लिस्ट ए मधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याने लिस्ट ए सामन्यात 268 धावा करणाऱ्या इंग्लंडच्या एली ब्राउनचा विक्रम मोडला. जगदीशनने भारताच्या रोहित शर्मालाही मागे टाकले. रोहितने श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची इनिंग खेळली होती.

सर्वात मोठी भागीदारी
त्याने 277 धावांच्या खेळीत 141 चेंडूंचा सामना केला. यामध्ये त्याने 25 चौकार आणि 15 षटकार मारले. पहिल्या विकेटसाठी त्याने साई सुदर्शनसोबत 416 धावांची भागीदारी केली. हा देखील एक विक्रमच आहे. साई सुदर्शनने 102 चेंडूत 154 धावा केल्या. त्याने 19 चौकार आणि दोन षटकार मारले.

हे सुद्धा वाचा

Maharashtra News : सामान्य माणसाला समोर ठेवून पत्रकारांनी काम करावे – डॉ. नीलम गोऱ्हे

CAT 2022 Exam Tips : अगदी काही दिवसांत होणाऱ्या CAT परिक्षेची तयारी कशी करायची? वाचा सविस्तर

Rishabh Pant Urvashi Rautela : पंत-उर्वशीच्या नात्याबाबत शुभमन गिलने केला मोठा खुलासा! म्हणाला,’त्याला फरक पडत नाही…’

एका हंगामात सर्वाधिक शतके
जगदीशनच्या आधी एका मोसमात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विजय हजारेचा विक्रम विराट कोहली, पृथ्वी शॉ आणि रुतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल यांच्या नावावर होता. या सर्वांनी चार शतके झळकावली होती.

सर्वोच्च धावसंख्या
या दोन डावांच्या जोरावर तामिळनाडूने दोन गड्यांच्या मोबदल्यात 506 धावांची विश्वविक्रमी धावसंख्या उभारली. लिस्ट ए मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. विश्वविजेत्या संघाने नेदरलँड्सविरुद्ध 498 धावा केल्या होत्या.

दरम्यान, 2017 मध्ये नारायण जगदीशन यांना विजय हजारे ट्रॉफी (एकदिवसीय सामना) खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल 2018 च्या लिलावात एन जगदीशनला धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले. त्याने या वर्षी चेन्नईसाठी शेवटचा आयपीएल सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळला होता, परंतु आयपीएल 2023 च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने तो सोडला होता. विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमात त्याने सलग पाच शतके झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. नारायण जगदीशनने आतापर्यंत 26 प्रथम श्रेणी, 42 लिस्ट ए आणि 51 टी-20 सामने खेळले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी