30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाDeepak Chahar : दीपक चहरला दुखापत झाल्याचे वृत्त खोटे, बीसीसीआयचे स्पष्टीकरण

Deepak Chahar : दीपक चहरला दुखापत झाल्याचे वृत्त खोटे, बीसीसीआयचे स्पष्टीकरण

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला दुखापत झाल्याने तो आशिया चषकासाठी खेळू शकणार नाही असे वृत्त समोर आले होते, परंतु हे वृत्त खोटे असल्याचे म्हणत दीपकला खरंच कोणती दुखापत झाली आहे का, आशिया चषकामध्ये त्याचा सहभाग असेल का या साऱ्याच बाबतीची स्पष्टता बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या वृत्ताला आता विराम मिळाला आहे. दीपक चहर याआधी झिम्बाब्वेच्या दौऱ्यात खेळला होता आणि पहिल्या वनडे लढतीत त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु या दौऱ्यादरम्यान दुखापत झाल्याने त्याच्या जागी कुलदीप सेनला निवडल्याचे सांगण्यात आले होते, त्यानंतर दीपकच्या दुखापतीची बाब सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने याबाबत चर्चा सुरू झाल्या.

दीपक चहरच्या दुखापतीविषयी बोलताना बीसीसीआयने म्हटले आहे की, दीपक चहरला दुखापत झालेली नाही आणि तो अजूनही संघासोबत आहे तर कुलदीप सेनला टीम इंडियामध्ये नेट बॉलर म्हणून बोलावण्यात आले आहे. चहर हा भारतीय संघाचा राखीव गोलंदाज आहे आणि त्यामुळेच तो भारतीय संघाबरोबर कायम आहे. त्यामुळे त्याला दुखापत झाली हे वृत्त खरं नाही, असे म्हणून त्यांनी या वृत्तालाच विराम दिला आहे.

हे सुद्धा वाचा…

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतःला म्हटले ‘कंत्राटी मुख्यमंत्री’

Transgender :आता तृतीयपंथींना देखील मिळणार केंद्र सरकारकडून आरोग्य सुविधा

BDD Chawl Redevelopment : पोलिसांना मिळणाऱ्या घरांच्या किंमतीची मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

दरम्यान, आशिया चषकात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक, संपुर्ण माहितीच आता समोर आली असून ही चषक स्पर्धा दुबईत पार पडणार आहे. आशिया चषकातील भारताचा पहिला सामना पाकिस्तान सोबत 28 ऑगस्ट रोजी होणार आहे त्यामुळे सगळ्यांचीच उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. तथापी, आशिया चषकातील अंतिम फेरीचा सामना 11 सप्टेंबर रोजी खेळण्यात येणार आहे त्यामुळे यंदाच्या या चषक स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी