भारतीय संघाचा माजी खेळाडू दिनेश कार्तिक लवकरच मैदानावर दिसणार आहे. या खेळाडूने यंदाच्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून खेळल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, आता या खेळाडूला घेऊन एक मोठी बातमी समोर आली आहे. दिनेश कार्तिक आता परदेशी T20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. (Dinesh Karthik join Paarl Royals SA20 League new season)भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज पुढच्या वर्षी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या फ्रँचायझी-आधारित T20 लीग SA20 मध्ये पार्ल रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. या T20 लीगच्या पुढच्या हंगामाची सुरुवात जानेवारीपासून होणार आहे. यामध्ये कार्तिक परदेशी खेळाडू म्हणून रॉयल संघाचा महत्वाचा भाग असणार आहे. (Dinesh Karthik join Paarl Royals SA20 League new season)
नाशिकमध्ये 6व्या राष्ट्रीय SDPF क्रीडा स्पर्धांचे डॉ.निलेश राणे युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजन
तुम्हाला सांगू इच्छितो की, या लीगमध्ये खेळणारा दिनेश हा भारताचा पहिला खेळाडू असेल. आयपीएलचा 17वा सीझन संपल्यानंतर दिनेशने आपल्या वाढदिवशी निवृत्तीची घोषणा केली होती. महत्वाची बाब म्हणजे बीसीसीआयने केवळ निवृत्त पुरुष खेळाडूंना परदेशी T20 लीगमध्ये खेळण्यास मान्यता दिली आहे. (Dinesh Karthik join Paarl Royals SA20 League new season)
दिनेश कार्तिकने भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 180 सामने खेळले आहेत. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने दिनेशची 2025 च्या IPL हंगामासाठी आपल्या संघाचे मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. (Dinesh Karthik join Paarl Royals SA20 League new season)
दिनेश कार्तिकने T20 क्रिकेटमध्ये एकूण 401 सामने खेळले आहेत. त्याने आयपीएलमधील सर्व 17 हंगामात भाग घेतला आहे. या दरम्यान तो एकूण 6 संघांचा भाग आहे.. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. (Dinesh Karthik join Paarl Royals SA20 League new season)
2025 हंगामासाठी पार्ल रॉयल्स SA20 संघ:
डेव्हिड मिलर, वाईना म्फाका, लुंगी एनगिडी, दिनेश कार्तिक, दयान गॅलियन, हुआन ड्राई प्रिटोरियस, ब्योर्न फोर्टेन, मिशेल व्हॅन बुरेन, अँडीले फेहलुक्वायो, कीथ डजॉन, न्काबा पीट, कोडी युसूफ.