29 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeक्रीडाFrench Open : 39 वर्षांची प्रतिक्षा संपली! फ्रेंच ओपन स्पर्धेत भारताच्या जोडीनं...

French Open : 39 वर्षांची प्रतिक्षा संपली! फ्रेंच ओपन स्पर्धेत भारताच्या जोडीनं गाजवंल मैदान

BWF सुपर 750 च्या पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये सात्विक आणि चिराग या जागतिक क्रमवारीतील 8व्या क्रमांकाच्या जोडीने लू चिंग याओ आणि यांग पो हान या 25व्या मानांकित चायनीज तैपेई जोडीचा 21-13, 21-19 असा पराभव केला.

भारताचे अनुभवी शटलर्स सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. चालू मोसमात एकत्र खेळणाऱ्या भारतीय जोडीचे हे दुसरे विजेतेपद आहे. भारताच्या पुरुष आणि महिला खेळाडूंनी एकेरीच्या सामन्यात निराशा केली असतानाच सात्विक आणि चिराग या जोडीने विजेतेपद पटकावून देशवासीयांना नाचण्याची संधी दिली आहे. BWF सुपर 750 च्या पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये सात्विक आणि चिराग या जागतिक क्रमवारीतील 8व्या क्रमांकाच्या जोडीने लू चिंग याओ आणि यांग पो हान या 25व्या मानांकित चायनीज तैपेई जोडीचा 21-13, 21-19 असा पराभव केला. हा सामना 48 मिनिटे चालला. सात्विक आणि चिराग ही जोडी फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकणारी दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. याशिवाय सुपर 750 स्पर्धा जिंकणारे दोघेही पहिले भारतीय आहेत.

पार्थो आणि विक्रम ही जोडी 1983 मध्ये चॅम्पियन ठरली.
यापूर्वी पार्थो गांगुली आणि विक्रम सिंग यांनी फ्रेंच ओपनमध्ये भारतासाठी पुरुष दुहेरीची अंतिम फेरी जिंकण्याचा पराक्रम केला होता. या भारतीय जोडीने 1983 साली ही स्पर्धा जिंकली होती. सात्विक आणि चिराग यांच्यातील अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दोघांची सुरुवात चांगली झाली. दोघांनी लवकरच 5-0 अशी आघाडी घेतली. भारतीय जोडी पहिल्या गेममध्ये 11-6 अशी पुढे होती. यानंतर सात्विक आणि चिराग जोडीने पहिला गेम 21-13 असा जिंकला.

हे सुद्धा वाचा

Gujarat Morbi Bridge Collapse : इंग्रजांनी बांधलेला 140 वर्ष जूना पूल भाजप सरकारने 5 दिवसांत पाण्यात घातला

IND vs SA : भारताचा पराभव पाकिस्तानला झोंबलाय! शोएब अख्तरचा झालाय ‘हार्टब्रेक’

INFLATION : देशातील महागाईचा सामना करण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न आवश्यक! आरबीआयचे विधान

रोमांचक दुसरा गेम
दुसऱ्या गेममध्येही भारतीय जोडीने चांगली सुरुवात केली मात्र त्यानंतर चायनीज तैपेईच्या जोडीने 11-5 अशी आघाडी घेत भारतीय जोडीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि 14-14 अशी बरोबरी साधली. या रोमांचक गेममध्ये एकवेळ 19-19 असा स्कोअर झाला. यानंतर भारतीय जोडीने संयमी खेळ करत 21-19 असा गेम जिंकला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी