पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाचा नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली. मोहम्मद रिझवान पाकिस्तानच्या पांढऱ्या चेंडू संघाचा नवा कर्णधार बनला आहे. यानंतर आता पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी राजीनामा दिला आहे. गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. (gary kirsten resigns as pakistan cricket team)
IND vs NZ: तिसऱ्या कसोटीतून ‘या’ स्टार खेळाडूला मिळू शकते विश्रांती, जाणून घ्या कारण
पीसीबीने एप्रिल 2024 मध्ये कर्स्टन यांची दोन वर्षांच्या करारावर नियुक्ती केली होती, परंतु ते केवळ सहा महिनेच या पदावर राहिले. या संदर्भात लवकरच एक सार्वजनिक निवेदन जारी केले जाईल. बोर्डाने त्यांच्या निवडीचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तानचे नवनियुक्त प्रशिक्षक कर्स्टन आणि जेसन गिलेस्पी आणि पीसीबी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. (gary kirsten resigns as pakistan cricket team)
AUS vs PAK: पाकिस्तान विरुद्ध टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने केला संघ जाहीर
🚨 Gary Kirsten, who signed a two-year contract in April with the PCB, has stepped down barely six months into the role
Full story 👉 https://t.co/UQrMsel61K pic.twitter.com/ar9xDBLUDb
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 28, 2024
संघ आणि नवीन मर्यादित षटकांच्या कर्णधाराची घोषणा करण्यात उशीर होण्याचे एक कारण म्हणजे बोर्डामध्ये सुरू असलेली चर्चा, ज्यामध्ये कर्स्टन यांना त्यांच्या सूचनांचा विचार करावा असे वाटत होते. पत्रकार परिषदेत जेव्हा नवीन कर्णधार मोहम्मद रिजवानची घोषणा करण्यात आली तेव्हा त्या पत्रकार परिषदेत फक्त पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यासह नवीन निवड समिती सदस्य आकिब जावेद आणि नवीन कर्णधार आणि उपकर्णधार सलमान आगा उपस्थित होते. त्यावेळी गॅरी कर्स्टन पाकिस्तानातही नव्हते. (gary kirsten resigns as pakistan cricket team)
गॅरी कर्स्टन हे तेच प्रशिक्षक आहेत ज्यांच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. याशिवाय गॅरी कर्स्टनने IPL 2024 मध्ये गुजरात टायटन्स संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. या वर्षी मे महिन्यात त्यांनी पाकिस्तान पांढऱ्या चेंडू संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले. त्याने आपल्या कार्यकाळाची सुरुवात इंग्लंडसोबत खेळलेल्या टी-20 मालिकेने केली. (gary kirsten resigns as pakistan cricket team)