27 C
Mumbai
Monday, March 20, 2023
घरक्रीडागिरीश महाजनांच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या नावाने भव्य स्पर्धा

गिरीश महाजनांच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या नावाने भव्य स्पर्धा

राज्याचे क्रीडा मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan ) यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा (Chhatrapati Shivaji Maharaj Cup State Level Holliball Tournament) लातूर येथे पार पडणार असून या स्पर्धेचे बोधचिन्ह आणि शुभंकर (मस्कॉट) चे मंत्री महाजन यांच्या हस्ते मुंबईत अनावरण करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील युवक, शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असून स्पर्धेला महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याबाबत आवाहन करावे अशा सुचना देखील त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. (Girish Mahajan initiative organized Chhatrapati Shivaji Maharaj Cup State Level Holliball Tournament)

या स्पर्धेसाठी येणारे खेळाडू, पंच, संघ व्यवस्थापक यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पिण्याचे पाणी, स्वच्छता यावर विशेष भर देण्याच्या सूचना क्रीडा मंत्री महाजन यांनी दिल्या. तसेच या स्पर्धेच्या आयोजनाविषयी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यात 2012 नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्वरुपाची स्पर्धा होत असून या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईज शेख यांनी मंत्री महाजन यांचे आभार मानले. तसेच या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

हे सुद्धा वाचा

भाच्याचा षडयंत्र रचल्याचा आरोप, मामा देखील नाराज; काँग्रेस हायकमांडला पाठविले पत्र

इराण्यांच्या वस्तीत घुसून पोलिसांची जिगरबाज कामगिरी

सुप्रिया सुळेंचे एकनाथ शिंदेंना पत्र!

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी तथा जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईज शेख, सचिव दत्ता सोमवंशी हे लातूर येथून, तर मुंबई येथून महाराष्ट्र हॉलीबॉल संघटनेचे सचिव संजय नाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे स्पर्धेचे बोधचिन्ह आणि शुभंकर अनावरण प्रसंगी उपस्थित होते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी