28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2022 : श्रीलंकेशी झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ अंतिम सामन्यात प्रवेश...

Asia Cup 2022 : श्रीलंकेशी झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल?

सध्या सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेमध्ये (Asia Cup 2022) भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) मंगळवारी झालेल्या 'सुपर ४' (Super 4) गटाच्या आपल्या दुसऱ्या सामन्यामध्ये श्रीलंकेशी (Sri Lanka Cricket Team) पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत.

सध्या सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेमध्ये (Asia Cup 2022) भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) मंगळवारी झालेल्या ‘सुपर ४’ (Super 4) गटाच्या आपल्या दुसऱ्या सामन्यामध्ये श्रीलंकेशी (Sri Lanka Cricket Team) पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. ‘सुपर ४’ गटामध्ये प्रथम भारताला पाकिस्तानशी आणि नंतर श्रीलंकेच्या संघाशी पराभव पत्करावा लागल्यामुळे सध्या भारतीय गोटात चिंतेचे वातारवरण आहे. ‘सुपर ४’ गटामध्ये आता अजून तीन सामने खेळायचे शिल्लक आहेत. हया तीन सामन्यांमध्ये भारताचा संघ आपला शेवटचा सामना अफगाणिस्तान संघाशी गुरूवारी खेळेल. हया सामन्यामध्ये भारताला मोठया फरकाने जिंकणे महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यांचा नेट रन रेट मध्ये सुधारणा होईल.‍ त्याशिवाय भारतीय संघाला बाकीच्या संघाच्या इतर दोन सामन्यांमध्ये सुद्धा नजरा खिळवून ठेवाव्या लागतील.

‘सुपर ४’ गटाच्या उर्वरित तीन सामन्यांचे वेळापत्रक –

७‍ सप्टेंबर – पाकिस्तान विरूद्ध अफगाणिस्तान
८ सप्टेंबर – भारत विरूद्ध अफगाणिस्तान
९ सप्टेंबर – श्रीलंका विरूद्ध पाकिस्तान

गुणतालिकेची स्थिती –

‘सुपर ४’ च्या गटातील दोन्ही सामने जिंकल्यामुळे सध्या श्रीलंका गुणत‍ालिकेमध्ये प्रथम स्थानावर आहे. पाक‍िस्तानचा तीन पैकी एक सामना जिंकल्यामुळे दुसऱ्या स्‍थानावर आहे. भारत आणि अफगाणिस्तानच्या संघाचा दोन पैकी दोन्ही सामन्यामध्ये पराभव झाल्यामुळे शून्य गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत. दोन्ही संघाच्या नेट रन रेट मध्ये किंचितसा फरक आहे.

हे सुद्धा वाचा –

खळबळजनक ! राजकीय क्षेत्रात खळबळ, 100 ठिकाणी इनकम टॅक्सच्या धाडी

Mahadev Jankar : महादेव जानकर हे निर्मला सीतारमण यांच्यापेक्षाही सरस !

Cabinet Minister Passes Away : कॅबिनेट मंत्र्याचे हृदयविकाराचा झटक्याने निधन

भारताला अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणती समीकरणे जुळून येण्याची गरज आहे –

श्रीलंका ‘सुपर ४’ सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे त्यांचे अंतिम सामन्यामध्ये स्थान निश्चित झाले आहे. भारतीय संघाने अफगाणिस्तानला मोठया फरकाने नमवून आपल्या नेट रन रेट मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. पाकिस्तान संघाचा श्रीलंकेशी व अफगाणिस्तान पराभव होणे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. असे झाल्यास भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संघाचे प्रत्येकी दोन गुण होतील आणि हया संघापैकी ज्या संघाचा नेट रन रेट सर्वात जास्त असेल तो ११ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम साामन्यात श्रीलंकेशी भिडेल.

भारताला अफगाणिस्तान संघाला कमी लेखून चालणार नाही –

भारतीय संघ गुरूवारी ‘सुपर ४’ च्या गटाच्या आपल्या शेवटच्या लढतीत अफगाणिस्तान संघाशी भिडेल. मोहम्मद नबी कर्णधार असलेल्या अफगाणिस्तान संघाने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम साखळी सामन्यांमध्ये श्रीलंका आणि बांग्लादेशच्या संघाचा पराभव केला होता. अफगाणिस्तानचे फिरकीपटू राशिद खान आणि मुजीब-उर-रहमान यांनी गुरूवारी चांगली गोलंदाजी केली तर भारतीय फंलदाज अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय फंलदाजांनी आपला खेळ उंचावून चांगली धावसंख्या उभारणे गरजेचे आहे.

आमच्या युट्युब चॅनेलसुद्धा सबस्क्राइब करा –

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी