दक्षिण आफ्रिकेच्या स्टार गोलंदाज गेराल्ड कोएत्झीला आयसीसीने मोठा धक्का दिला आहे. गेराल्ड कोएत्झीने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात पंचांच्या निर्णयावर असहमत व्यक्त केले होते. त्यानंतर आता आयसीसीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने कलम 2.8 चे उल्लंघन मानले आणि त्याला 1 डिमेरिट पॉइंट दिला. (icc has given demerit points on gerald coetzee)
पाकिस्तानने अचानक बदलला कर्णधार, आता या खेळाडूकडे आली जबाबदारी
काय होतं प्रकरण?
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीने भारतासाठी चौथ्या T20 सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयाशी असहमत व्यक्त केले होते. त्याचा चेंडू पंचांनी वाईड घोषित केला, त्यानंतर वेगवान गोलंदाजाने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. त्यामुळे आता आयसीसीने त्याला मोठा झटका दिला आहे. कोएत्झीला आयसीसीने संहितेच्या कलम 2.8 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. (icc has given demerit points on gerald coetzee)
एकदिवसीय आणि T-20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, या दोन खेळाडूचे झाले पुनरागमन
दुसरीकडे, तिसऱ्या टी20 सामन्यानंतर आयसीसीने नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स आणि ओमानचा गोलंदाज सुफियान महमूद यांनाही मोठा झटका दिला आहे.
एडवर्ड्सचे दोन वेगळे उल्लंघन होते. सर्वप्रथम त्याने एलबीडब्ल्यू आऊट झाल्यानंतर बॅटने बोट दाखवून आपली असहमत दाखवली आणि नंतर निराश होऊन त्याने आपली बॅट आणि ग्लोव्हज मैदानावर फेकले. या प्रकरणात तो कलम 2.8 आणि कलम 2.2 अंतर्गत दोषी आढळला होता. (icc has given demerit points on gerald coetzee)
नेदरलँड्सच्या कर्णधाराला 10 टक्के मॅच फी कपात आणि दोन डिमेरिट पॉइंट देण्यात आले. ओमानचा वेगवान गोलंदाज सुफयान महमूदलाही त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय त्याला 1 डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. (icc has given demerit points on gerald coetzee)
भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या 4 सामन्यांच्या T20 मालिकेत घातक गोलंदाजाची सरासरी कामगिरी होती. पहिल्या सामन्यात गेराल्ड कोएत्झीने 3 बळी घेतले होते, तर शेवटच्या 3 सामन्यात 1 बळी मिळवला होता. मात्र, दुसऱ्या T20 सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत कठीण परिस्थितीत संघासाठी नाबाद 19 धावा केल्या आणि आपल्या देशासाठी सामना जिंकून दिला. मात्र, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने ही मालिका 3-1 अशी जिंकली. (icc has given demerit points on gerald coetzee)