3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा देखील सुरु होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत सराव सामने होणार आहेत. दुबईतील सेव्हन्स स्टेडियम आणि आयसीसी अकादमी ग्राउंड आणि आयसीसी अकादमी ग्राउंड क्रमांक 2 येथे तीन दिवसांत 10 सामने होणार आहेत. (icc women t20 world cup 2024 team india schedule)
युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भारतीय संघाचा सामना 29 सप्टेंबर रोजी वेस्ट इंडिजशी होणार असून, हा दुबईच्या आयसीसी अकादमी मैदानावर होणार आहे. त्यांचा दुसरा आणि शेवटचा सराव सामना मंगळवार, 1 ऑक्टोबर रोजी दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर लॉरा वोल्वार्डच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. (icc women t20 world cup 2024 team india schedule)
बांगलादेशला बसला मोठा धक्का, शाकिब अल हसनने केली निवृत्तीची घोषणा
विश्वचषकात भारताचा पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 4 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे. त्याचवेळी, 6 ऑक्टोबर रोजी क्रिकेट जगतातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगणार आहे. 9 तारखेला श्रीलंका आणि 13 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाचा सामना होणार आहे. (icc women t20 world cup 2024 team india schedule)
𝗠𝗮𝗿𝗸 𝗬𝗼𝘂𝗿 𝗖𝗮𝗹𝗲𝗻𝗱𝗮𝗿 🗓️#TeamIndia‘s schedule for the ICC Women’s #T20WorldCup 2024 is 𝙃𝙀𝙍𝙀 🔽 pic.twitter.com/jbjG5dqmZk
— BCCI Women (@BCCIWomen) August 26, 2024
महिला T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया (फिटनेसच्या अधीन), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, रा. श्रेयंका पाटील (फिटनेसच्या अधीन), सजना सजीवन (icc women t20 world cup 2024 team india schedule)
प्रवासी राखीव: उमा छेत्री (wk), तनुजा कंवर, सायमा ठाकोर