नमो चषक मधील रस्सी-खेच, खो-खो, हॉली बॉल,कबड्डी, बुद्धिबळ,कुस्ती,टेबल टेनिस.. या खेळाचे उद्घाटन मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे- पाटील महसूल मंत्री,महाराष्ट्र राज्य, मा.खा.श्री.समीर उरांव राष्ट्रीय अध्यक्ष अनुसूचित जनजाती मोर्चा,भाजपा. मा.विजय चौधरी-सरचिटणीस प्रदेश भाजपा यांच्या शुभ हस्ते व्ही. एन.नाईक इंजीनियरिंग कॉलेज, गंगापूर रोड,नाशिक येथे सपन्न झाले. यावेळी आ.प्रा.देवयानी फरांदे,आ.राहूल आहेर,केदा आहेर- लोकसभा प्रमुख, मा.नयना गुंडे,आयुक्त आदिवासी विकास महामंडळ, मा.श्री.प्रशांत जाधव अध्यक्ष भाजपा नाशिक महानगर., मा.श्रीकांत पवार,उपायुक्त महापालिका,मा.लक्ष्मीकांत साताळकर,उपायुक्त- प्रशासन नाशिक महानगर पालिका, मा.शिवकुमार वंजारी,शहर अभियंता-नाशिक आदी मान्यवर उपस्थित होते.
युवकांच्या कला क्रीडागुणांना वाव देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक २०२४ चे आयोजन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्हा – तालुका स्तरावर ‘नमो चषक’ कला-क्रीडा स्पर्धेचे आयोजन केलेले आहे . त्यानुसार नाशिक मध्य विधानसभेत आमदार देवयानी फरांदे यांनी विविध २३ स्पर्धाचे आयोजन केले आहे. नाशिक मध्ये विविध क्रीडांगणांवर होता आहेत.स्पर्धेत फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, १०० मी., ४०० मी. धावणे, कुस्ती, कॅरम, बुद्धिबळ, नृत्य, गायन , वकतृत्व, चित्रकला, रांगोळी अशा कला, क्रीडा प्रकारांचा समावेश असून महिला व पुरुष गटांत स्पर्धा उत्साहात सुरू आहे. विजेत्या खेळाडूना आकर्षक बक्षिसे तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
यावेळी अनिल भालेराव,सुनील देसाई,वसंत उशीर,श्याम बडोदे,सागर शेलार,संदीप लेनघर,यशवंत निकुळे,गोपी रजपूत,शिवा जाधव,सुनील पटेल,अतुल क्षीरसागर,अजिक्य साने, चंद्रकांत खोडे,दीपाली कुलकर्णी,सुनील खोडे,सचिन कुलकर्णी,अवधुत कुलकर्णी, तुषार जोशी,फिरोज शेख,पप्पू शेख,रफिख शेख,शरद जाधव, अमोल गांगुर्डे,पार्थ मानकर, नितीन बांडे,बापू यशोद,नाना सूर्यवंशी,सतबीर दहिया आदी सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सह युवा खेळाडू व खेळाडूचे पालक,क्रीडा शिक्षण व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.