भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना संपला आहे. तसेच, या सामनासोबतच भारतने दोन कसोटी सामन्यांची मालिकासुद्धा जिंकली आहे. या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर येथे झाला. टीम इंडियाने हा सामना जिंकून मालिका 2-0 ने जिंकली. (ind vs ban 2nd test team india won)
विशेष म्हणजे या सामन्याचे 3 दिवस पावसामुळे खराब झाले होते, या तीन दिवसांपैकी 2 दिवस खेळ सुरूही होऊ शकला नाही, असे असतानाही भारतीय संघाने कानपूर कसोटी अवघ्या 2 दिवसांत जिंकली. हा सामना जिंकून भारतीय संघाने विक्रमांची मालिका रचली आहे. (ind vs ban 2nd test team india won)
महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना
टीम इंडियाने बांगलादेशचा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव केला आहे. यासह भारताने घरच्या मैदानावर सलग कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम आणखी सुधारला आहे. आता मायदेशात सलग 18 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. यापूर्वी भारताने घरच्या मैदानावर सलग 17 मालिका जिंकल्या होत्या. या बाबतीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर सलग 10 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. (ind vs ban 2nd test team india won)
युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
The sweep shot from Virat Kohli.pic.twitter.com/zsA16afY8S
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 1, 2024
टीम इंडियाने चौथ्या दिवशी जोरदार फलंदाजी केली. जणू काही T20 सामना चालू आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला वेगवान सुरुवात करून दिली. यानंतर इतर खेळाडूंनीही ती राखली. पहिल्या डावात रोहित आणि जैस्वाल यांच्यात अवघ्या 19 चेंडूत 50 धावांची भागीदारी झाली होती. जी रेड बॉल क्रिकेटमधील सर्वात वेगवान 50 धावांची भागीदारी आहे. (ind vs ban 2nd test team india won)
JASPRIT BUMRAH, THE OFF SPINNER.
– What a turn to dismiss Mushfiqur. 🤯pic.twitter.com/1McvFMgS5v
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 1, 2024
कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाने 34.4 षटकात 285 धावा करून डाव घोषित केला. 50 षटकांपूर्वीच कोणत्याही संघाने डाव घोषित करण्याची ही 21 व्या शतकातील पहिलीच वेळ आहे.
चौथ्या दिवशी भारताने सर्वात जलद 50, 100, 150, 200 आणि 250 धावा केल्या. यासह भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. भारताने 25 षटकात 204 धावा केल्या होत्या. यासह टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक ठोकणारा संघ बनला आहे. भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाने हा पराक्रम केला होता. ज्याने 2017 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 28.1 षटकात द्विशतक पूर्ण केले होते.