27 C
Mumbai
Friday, December 2, 2022
घरक्रीडाIND vs BAN : बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यांत के एल राहुल संघाबाहेर! पाहा...

IND vs BAN : बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यांत के एल राहुल संघाबाहेर! पाहा भारताची संभाव्य प्लेइंग 11

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल की नाही, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मात्र, खराब फॉर्म असूनही कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन केएल राहुलवर विश्वास दाखवू शकेल, असे मानले जात आहे.

पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतरही उपांत्य फेरीसाठी टीम इंडियाचा दावा मजबूत आहे. बुधवारी (2 नोव्हेंबर) भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध आपला पुढचा सामना खेळणार आहे. त्याचवेळी टीम इंडिया 6 नोव्हेंबरला झिम्बाब्वेसमोर असेल.

केएल राहुलचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला
भारत-बांगलादेश सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट झाली असली, तरी सलामीवीर केएल राहुलचा खराब फॉर्म ही समस्या कायम आहे. केएल राहुल 2022 च्या T20 विश्वचषकातील 3 सामन्यात केवळ 22 धावा करू शकला आहे. केएल राहुलचा हा फॉर्म टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि व्यवस्थापनासाठी डोकेदुखी ठरला आहे.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Politics : ‘…नाहीतर राज्यातला ऑक्सिजन गुजरातला गेला असता’

Bachhu Kadu : ‘सत्ता गेली चुलीत, आम्हांला त्याची पर्वा नाही!’ बच्चू कडू आक्रमक

Rambha Car Accident : सलमान खानच्या अभिनेत्रीचा भीषण कार अपघात

बांगलादेशविरुद्ध केएल राहुलला संधी मिळेल का?
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल की नाही, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मात्र, खराब फॉर्म असूनही कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन केएल राहुलवर विश्वास दाखवू शकेल, असे मानले जात आहे. त्याचबरोबर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला आजमावू शकते. खरंतर, दिनेश कार्तिक 2022 च्या T20 विश्वचषकात आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळू शकते, असे मानले जात आहे.

बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवी अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!