28 C
Mumbai
Wednesday, December 7, 2022
घरक्रीडाIND vs NED : नाणेफेक जिंकताच रोहित शर्माचा मास्ट्रस्ट्रोक! प्रथम फलंदाजी करण्याचा...

IND vs NED : नाणेफेक जिंकताच रोहित शर्माचा मास्ट्रस्ट्रोक! प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकात पुढील सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आलीच तर त्यासाठी सराव म्हणून घेतलेला निर्णय भारतीय संघासाठी मास्टरस्ट्रोक ठरू शकतो.

T20 विश्वचषक 2022 चा 23 वा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सिडनी येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा वरचष्मा दिसत आहे. पण नेदरलँडला कमकुवत समजणे चूक ठरेल. यावेळी टी-20 विश्वचषकातील अनेक सामन्यांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली फॉर्मात आहे. या सामन्यातही ते तुफानी कामगिरी करू शकतात. टीम इंडियालाही सूर्यकुमार यादवकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. दरम्यान, या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकात पुढील सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आलीच तर त्यासाठी सराव म्हणून घेतलेला निर्णय भारतीय संघासाठी मास्टरस्ट्रोक ठरू शकतो.

सूर्यकुमार यादवची बॅट नेदरलँडविरुद्ध खेळू शकते. तो तुफानी खेळी खेळू शकतो. कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल पाकिस्तानविरुद्ध काही खास करू शकले नाहीत. पण हे दोन्ही खेळाडू आज भारताला चांगली सुरुवात देऊ शकतात. टीम इंडियाचे गोलंदाजही फॉर्मात आहेत. त्यामुळे नेदरलँडला अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमीसारख्या गोलंदाजांपासून दूर राहावे लागेल. भुवनेश्वर कुमार पॉवर प्लेमध्ये धोकादायक ठरतो. त्याला या सामन्यात विकेट्सही मिळू शकतात.

हे सुद्धा वाचा

Credit Card Details : जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे, तर तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती असाव्यात!

Health Tips : अपूर्ण झोपेमुळे उद्भवतात ‘हे’ विकार! वाचा संपूर्ण माहिती

IND vs NED : भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात पावसाची शक्यता? पाहा कसे असेल वातावरण

नेदरलँड्स संघाविषयी बोलायचे झाले तर, त्यात अनेक चांगले खेळाडू आहेत, जे भारताविरुद्ध विकेट घेण्यासोबतच धावाही करू शकतात. बास डी लीडकडून संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. टीम इंडियाविरुद्ध कर्णधार स्कॉट एडवर्ड्सही चांगली कामगिरी करू शकतो. जर रोलॉफ व्हॅन डर मर्वेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले तर तो संघासाठी चांगला निर्णय ठरू शकतो.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

नेदरलँड्स: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, बास डी लीड, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/यष्टीरक्षक), टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद/रोलोफ व्हॅन डर मर्वे, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!