31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeक्रीडाIND vs NZ: आर अश्विनने इतिहास रचला, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठा पराक्रम...

IND vs NZ: आर अश्विनने इतिहास रचला, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठा पराक्रम केला

या सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने चांगली सुरुवात केली. (IND vs NZ 2nd Test ravichandran ashwin most wickets wtc history)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात  आज पुण्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. हा सामना पुण्यातील MCA स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने चांगली सुरुवात केली. (IND vs NZ 2nd Test ravichandran ashwin most wickets wtc history)

सामना अर्धवट सोडून घरी परतला ‘हा’ खेळाडू, जाणून घ्या कारण

मात्र, या सामन्यात भारतीय संघाच्या आर अश्विनने आपल्या गोलंदाजीने सर्वांचा लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. अश्विन गोलंदाजी करायला येताच त्याने न्यूझीलंड संघाच्या कर्णधाराला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पहिल्या सत्राच्या अखेरीस आर अश्विनने 2 बळी घेतले होते. यासह आर अश्विनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. (IND vs NZ 2nd Test ravichandran ashwin most wickets wtc history)

SRH सोडल्यानंतर डेल स्टेन आता या संघात झाला सामील

अश्विनने पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी आपल्या गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले. या भारतीय खेळाडूने पहिल्या सत्रात 2 विकेट्स घेऊन जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत प्रथम स्थान मिळवले आहेत. यासह अश्विनने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज नॅथन लायनला मागे टाकले आहे. (IND vs NZ 2nd Test ravichandran ashwin most wickets wtc history)

आतापर्यंत या यादीत नॅथन लिऑन पहिल्या क्रमांकावर होता. नॅथनच्या नावावर 43 सामन्यात 187 विकेट आहेत. आता अश्विनने केवळ 39* सामन्यांमध्ये हा आकडा पार केला आहे. अश्विनच्या नावावर 188* विकेट्स आहेत. (IND vs NZ 2nd Test ravichandran ashwin most wickets wtc history)

पुणे येथे खेळला जाणाऱ्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी आर अश्विनने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमची विकेट घेतली. यानंतर अश्विनने दुसरा फलंदाज विल यंगला बाद केले. पहिल्या सत्राच्या 7 षटकांनंतरच कर्णधार रोहित शर्माने अश्विनला गोलंदाजीवर टाकले. याचा फायदाही टीम इंडियाला पहिल्या सत्रात मिळाला. (IND vs NZ 2nd Test ravichandran ashwin most wickets wtc history)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी