भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालने चमकदार कामगिरी केली. या सामन्यात त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 1000 हून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला. हा आकडा त्याने वयाच्या 23 व्या वर्षी हा गाठला असून, असं करणार तो पहिला खेळाडू ठरला. या चमकदार कामगिरीमुळे तो भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा स्टार बनला असून भविष्यात त्याच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे. चला जाणून घेऊया अशा खेळाडूंबद्दल ज्यांनी वयाच्या 23 वर्षापूर्वी 1000 पेक्षा जास्त कसोटी धावा केल्या आहेत. (ind vs nz 2nd test yashasvi jaiswal 1000 test runs)
गॅरी सोबर्स (1958)
गॅरी सोबर्सने 1958 मध्ये 1193 धावा केल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वय 23 वर्षांपेक्षा कमी होते. इतक्या लहान वयात त्याने शानदार फलंदाजी करून जगभरात नाव कमावले. (ind vs nz 2nd test yashasvi jaiswal 1000 test runs)
IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरच्या जादुई चेंडूला समजू नाही शकला फलंदाज आणि…
ग्रॅम स्मिथ (2003)
ग्रॅमी स्मिथने 2003 मध्ये 1198 धावा केल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वय 23 वर्षांपेक्षा कमी होते. त्याच्या चमकदार फलंदाजी आणि कर्णधारपदामुळे तो पटकन दक्षिण आफ्रिकेचा स्टार बनला. (ind vs nz 2nd test yashasvi jaiswal 1000 test runs)
एबी डिव्हिलियर्स (2005)
एबी डिव्हिलियर्सने 2005 मध्ये 1008 धावा केल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वय 23 वर्षांपेक्षा कमी होते. कोणत्याही परिस्थितीत तो चांगला खेळला ही त्याची खासियत होती आणि त्यामुळेच तो खास बनला.
ॲलिस्टर कुक (2006)
ॲलिस्टर कुकने 2006 मध्ये 1013 धावा केल्या होत्या. त्यावेळी तो 23 वर्षांपेक्षा लहान होता. त्याची फलंदाजी अतिशय शांत आणि मजबूत होती, ज्यामुळे तो इंग्लंडसाठी यशस्वी सलामीवीर ठरला. (ind vs nz 2nd test yashasvi jaiswal 1000 test runs)
यशस्वी जैस्वाल (2024)*
यशस्वी जैस्वालने 2024 मध्ये 1001 धावा केल्या होत्या. एवढ्या लहान वयात या धावा करणे त्याच्यातील प्रतिभा दाखवते. यशस्वीची क्रिकेटप्रती असलेली मेहनत आणि समर्पण त्याला इथपर्यंत घेऊन आले आहे. (ind vs nz 2nd test yashasvi jaiswal 1000 test runs)