31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeक्रीडाIND vs NZ: तिसऱ्या कसोटीतून ‘या’ स्टार खेळाडूला मिळू शकते विश्रांती, जाणून...

IND vs NZ: तिसऱ्या कसोटीतून ‘या’ स्टार खेळाडूला मिळू शकते विश्रांती, जाणून घ्या कारण 

तिसऱ्या सामन्यातून रवींद्र जडेजाला विश्रांती मिळू शकते. (ind vs nz 3rd test ravindra jadeja out mumbai test)

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला. तसेच तिसरा आणि शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळू शकते. तिसऱ्या सामन्यातून रवींद्र जडेजाला विश्रांती मिळू शकते. (ind vs nz 3rd test ravindra jadeja out mumbai test)

AUS vs PAK: पाकिस्तान विरुद्ध टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने केला संघ जाहीर

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा सातत्याने टीम इंडियाकडून खेळत आहे. याआधी जडेजा बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये खेळताना दिसला होता. या मालिकेत जडेजाने बॅट आणि बॉल अशा दोन्ही प्रकारे खळबळ उडवून दिली. याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही जडेजाची कामगिरी चांगली झाली आहे. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, जडेजाला आता मुंबईत होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. (ind vs nz 3rd test ravindra jadeja out mumbai test)

IND vs SA: 8 नोव्हेंबरपासून सुरू होईल T20 मालिकेचा थरार, येथे पहा वेळापत्रक

कामाच्या ओझ्यामुळे जडेजाला तिसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत बीसीसीआय किंवा संघ व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. न्यूझीलंडनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. जिथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठी रवींद्र जडेजाची संघात निवड झाली आहे. याचा विचार करून संघ व्यवस्थापन तिसऱ्या कसोटी सामन्यातून जडेजाला विश्रांती देऊ शकते. (ind vs nz 3rd test ravindra jadeja out mumbai test)

तिसऱ्या कसोटी सामन्यातून रवींद्र जडेजाला विश्रांती दिल्यास संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आणखी एक मजबूत अष्टपैलू अक्षर पटेलची निवड होऊ शकते. अक्षर पटेल हा देखील या मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाचा एक भाग आहे परंतु आतापर्यंत त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झालेली नाही. अशा स्थितीत आता त्याला मुंबई कसोटीत संधी मिळू शकते, अशी आशा आहे. (ind vs nz 3rd test ravindra jadeja out mumbai test)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी