भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 16 ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. मात्र, या सामन्यापूर्वीच टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. शुभमन गिलच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा युवा फलंदाज सर्फराज खानला त्याच्या जागी संघात घेण्याची संधी आहे. (ind vs nz sarfaraz khan chance the bengaluru match)
बांगलादेश क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा निलंबित
भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलचे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणे साशंक आहे. मान आणि खांदेदुखीच्या तक्रारीनंतर गिलला खेळणे साशंक आहे. सामन्यापूर्वी संघ व्यवस्थापन त्याच्याबाबत निर्णय घेईल. (ind vs nz sarfaraz khan chance the bengaluru match)
गिलची यंदाची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे.गिलने 8 कसोटी सामन्यांच्या 15 डावात 50.92 च्या सरासरीने 662 धावा केल्या आहेत. या वर्षी कसोटीत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने या वर्षात 3 शतके आणि 2 अर्धशतकेही केली आहेत. (ind vs nz sarfaraz khan chance the bengaluru match)
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का
जर शुभमन गिल पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला तर टीम इंडिया त्याच्या जागी सरफराज खानचा समावेश करू शकते. सर्फराज खान सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. इराणी ट्रॉफीमध्ये त्याने द्विशतक झळकावले. याशिवाय त्याने आपल्या कारकिर्दीत 3 कसोटी सामन्यांच्या 5 डावात 50 च्या सरासरीने 200 धावा केल्या आहेत. या काळात त्याने तीन अर्धशतकेही केली आहेत. (ind vs nz sarfaraz khan chance the bengaluru match)
त्याचवेळी गिल या सामन्यातून बाहेर पडला तर त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर केएल राहुल फलंदाजी करू शकतो. अशा स्थितीत सर्फराज पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसतो. (ind vs nz sarfaraz khan chance the bengaluru match)
पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद. सिराज, आकाश दीप.