श्रीलंकाने बुधवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 110 धावांनी पराभव केला. यासह श्रीलंकेने ही मालिका 2-0 अशी जिंकली आहे. श्रीलंकेच्या संघाला 27 वर्षांनंतर भारताविरुद्धची वनडे मालिका जिंकण्यात यश आले आहे. या पराभवानंतर भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा निराश दिसला आणि त्याने आपल्या संघाच्या चुका मान्य केल्या. (Ind vs SL Rohit Sharma statement after 3rd odi loss)
Paris Olympics 2024: विनेश फोगाटने घेतली निवृत्ती, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. यानंतर श्रीलंकेने शेवटचे दोन सामने जिंकून मालिका जिंकली. श्रीलनक क्रिकेट संघासाठी हा खूप मोठा विजय आहे. कारण, 1997 नंतर पहिल्यांदा श्रीलंकेने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे. म्हणजेच 27 वर्षांनंतर श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव केला आहे. (Ind vs SL Rohit Sharma statement after 3rd odi loss)
Paris Olympics 2024: विनेश फोगाटने केला उपांत्य फेरीत प्रवेश
या मालिकेत भारतीय संघाचे फलंदाज स्पिनसमोर त्रस्त दिसले. सामन्यानंतर रोहितला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मला वाटत नाही की ही चिंतेची बाब आहे, परंतु ही गोष्ट आहे जी आपण गांभीर्याने घेतली पाहिजे. आमचा वैयक्तिक गेमप्लॅनने आम्हाला या मालिकेत दबावाखाली ठेवले.” (Ind vs SL Rohit Sharma statement after 3rd odi loss)
Paris Olympics: नीरज चोप्राची कमाल, पहिल्याच प्रयत्नात ठरला अंतिम फेरीसाठी पात्र
रोहितला जेव्हा विचारण्यात आले की टी-20 वर्ल्ड कप-2024 च्या विजयानंतर टीम इंडिया थोडी बेफिकीर झाली आहे का? यावर रोहित म्हणाला, “नाही, हा विनोद आहे. तुम्ही भारताकडून खेळता तेव्हा निष्काळजी राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.जिथे ज्यात चांगले आहोत त्याचे श्रेय आम्हाला द्यावे लागेल. श्रीलंकेचा संघ आमच्यापेक्षा चांगला खेळला. आम्ही परिस्थिती पाहिली. , आम्ही वेगवान आहोत. एकंदरीत आम्ही चांगले क्रिकेट खेळलो नाही आणि म्हणूनच आम्ही येथे उभे आहोत.” (Ind vs SL Rohit Sharma statement after 3rd odi loss)
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने सात गडी गमावून 248 धावा केल्या. भारतीय संघ 26.1 षटकात अवघ्या 138 धावांत आटोपला आणि सामना गमावला. (Ind vs SL Rohit Sharma statement after 3rd odi loss)