क्रीडा

India’s Loss to Australia: ‘आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही’ – रोहित शर्मा

भारत (Indian Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांमध्ये सुरू झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभव पत्कारावा लागला. सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भारतीच संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कबूल केले की, भारतीय गोलंदाजाच्या सुमार कामगिरीमुळे भारताला पहिल्या सामन्यामध्ये ‍जिंकण्यास अपयश आले. पुरूषांची टी-20 विश्वचषक (Men’s T-20 World Cup) पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे मागील काही सामन्यांमधील भारतीय गोलंदाजाची खराब कामगिरी हा संघ व्यवस्थापनेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. भारतीय संघाच्या फलंदाजानीं पहिल्या डावामध्ये आपल्या लौकिकाला साजेशी अशी फंलदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाला 209 धावांचे मोठे लक्ष्‍य दिले. त्यामध्ये हार्दिक पंडया (71 नाबाद), के. एल. राहुल (55) व सूर्यकुमार यादव यांनी (46) धावा करत तडाखेबाज फंलदाजीचे प्रदर्शन केले. ‍

पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रित बुमराह याच्या अनुपस्थितीत इतर गोलंदाजानीं सुमार गोलंदाजी केली. त्यात भर म्हणून भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करताना ऑस्ट्रेलिया फंलदाजांचे तीन झेल सोडले. या सर्व कारणांमुळे भारताला चुरशीच्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला.

भारताच्या पराभवाचे विश्लेषण करताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, मला वाटत नाही की आम्ही चांगली गोलंदाजी केली. तुमच्या संघाने प्रथम फंलदाजी करताना 200 बनविल्या तर गोलंदाजी करताना विरोधी संघाला त्यापेक्षा कमी धावामध्ये रोखणे शक्य असते. त्याशिवाय, आम्ही क्षेत्ररक्षणही म्हणावे तसे चांगले केले नाही. आमच्या फलंदाजानीं खूप चांगल्या फंलदाजीचे प्रदर्शन केले परंतु, गोलंदाजानीं आमची निराशा केली.

शर्मा पुढे नमूद केले की, तुम्ही प्रत्येक सामन्यामध्ये 200 धावा करू शकत नाही. तसे करण्यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी करण्याची गरज असते. हार्दिक (पंडया) ने उत्कृष्ट फंलदाजी करत 200 धावा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आम्हाला पुढच्या सामन्याचा आधी आमच्या गोलंदाजीवर लक्ष दयावे लागणार आहे. हया सामन्यामुळे आम्हाला कळले आहे की, कोणत्या गोष्टींमध्ये आम्ही कमकुवत आहोत व कोणत्या बाबींवर आम्हाला अधिक देण्याची गरज आहे.

सामन्यातील खेळपटटीवर भाष्य करताना रोहित म्हणाला की, आम्हाला माहित होते की, या मैदानावर दोन्ही संघांकडून मोठया धावा होतात. परंतु 200 धावा करूनही तुम्हाला सावध रहावे लागते. आम्हाला त्यांच्या (ऑस्ट्रेलिया) संघातील खेळाडूंना बाद करण्यात काही प्रमाणात यश आले. परंतु त्यांनी चांगले फटके मारत सुंदर फंलदाजीचे प्रदर्शन केले. जेव्हा त्यांना शेवटच्या चार षटकांमध्ये 60 धावांची गरज होती तेव्हा आम्हाला त्यांच्या उर्वरीत खेळाडूंना बाद करण्यात अपयश आले. मला वाटते की, तोच सामन्याला कलाटणी देणारा क्षण होता. जर आम्हाला तेव्हा त्यांच्या खेळाडूंना बाद करण्यात यश मिळाले असते तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.

हे सुद्धा वाचा –

Congress : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये ‘दोन’ महत्त्वाचे नेते आघाडीवर

Sharad Pawar : राज्याच्या प्रमुखाने बाकीच्या गोष्टी सोडून राज्याच्या प्रशासनावर लक्ष द्यावे, शरद पवारांचा कानमंत्र

Aaditya Thackeray : शिंदे सरकार महाराष्ट्रातील रोजगार पळवतेय; आदित्य ठाकरेंचा आरोप

सामना ‍जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार आरॉन फिंचच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता.

200 धावांचे आव्हानात्मक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केल्यानंतर प्रतिक्रिया देताना फिंच म्हणाला की, हा सामना अंत्यत चुरशीचा होता यामध्ये कोणतेही दुमत नाही. कारण दोन्ही संघानी चांगले प्रदर्शन केले. परंतु आमच्या फंलदाजांनी काही महत्त्वपूर्ण भागीदारी रचल्या. जेव्हा ठराविक अंतराने तुमचे खेळाडू बाद होतात तेव्हा तुमच्या संघाच्या धावाची गती कमी होणे स्वाभाविक आहे परंतु आमच्या फंलदाजांनी ‍टिच्चून फंलदाजी करत सामन्याला कलाटणी दिली. यासारखे महत्त्वाचे विजय मिळाल्यानंतर संघातील प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास नक्कीच वाढण्यास मदत होते. या मालिकेमध्ये चांगले प्रदर्शन करून पूर्ण ताकदीनिशी येणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये उतरण्याचा आमचा निर्धार आहे.

भारत व ऑस्ट्रेलिया संघाचा दुसरा टी-20 सामना 23 सप्टेंबरला नागपूर येथे खेळवला जाणार आहे.

अश्विन शेश्वरे

He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

1 day ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

1 day ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 day ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago