28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाचौथ्या कसोटी सामन्यात भारत मोडणार ऑस्ट्रेलियाचा विक्रम; वाचा काय आहे विशेष संधी

चौथ्या कसोटी सामन्यात भारत मोडणार ऑस्ट्रेलियाचा विक्रम; वाचा काय आहे विशेष संधी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 चा शेवटचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपैकी एक असलेले अहमदाबादचे हे स्टेडियम या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एक विशेष विक्रम करू शकते, जो सध्या ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या नावावर आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 चा शेवटचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपैकी एक असलेले अहमदाबादचे हे स्टेडियम या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एक विशेष विक्रम करू शकते, जो सध्या ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या नावावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात सर्वाधिक प्रेक्षक येण्याचा विक्रम मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या नावावर आहे. आता हा विक्रम मोडीत काढण्याची विशेष संधी भारतीय चाहत्यांकडे आहे.

सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील अहमदाबाद कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवसाच्या खेळाची आतापर्यंत 85,000 पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली आहेत. यासह स्टेडियममध्ये विद्यार्थी आणि कुटुंबीयांना सामना पाहण्याची सुविधा मिळाल्यास पहिल्याच दिवशी हा आकडा 1 लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अहमदाबाद स्टेडियमची एकूण क्षमता 1,32,000 इतकी आहे.

अहमदाबाद स्टेडियमवर 1 लाख लोकांनी एकत्रितपणे कसोटी सामन्याचा आनंद घेतला, तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित असतील. यापूर्वी, 2013-14 ऍशेस मालिकेदरम्यान MCG येथे एकाच दिवसात सर्वाधिक प्रेक्षक येण्याचा विक्रम नोंदवला गेला होता, त्यावेळी 91,112 प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये बसून सामन्याचा आनंद घेतला होता. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात हा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

डॉ. विजय चोरमारे लिखीत नव्या पुस्तकाचे आज प्रकाशन !

साताऱ्यात भाजप-शिंदेगट आमने सामने! शंभुराज देसाई अन् उदयनराजेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

सरकारच्या निषेधार्थ बळीराजाने केली कांद्याची होळी..!

भारताचे पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही उपस्थित राहणार आहेत
शेवटच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज होही स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान, तो सामना सुरू होण्यापूर्वी उद्घाटन समारंभाचा भाग देखील असेल. या कसोटी मालिकेत आतापर्यंत खेळलेल्या 3 कसोटी सामन्यांपैकी भारतीय संघाने पहिले 2 सामने जिंकले होते, तर तिसरा कसोटी सामना 9 गडी राखून जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत शानदार पुनरागमन केले.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात खेळवली जात असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील शेवटचा कसोटी सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पोहोचला आहे. भारताला अंतिम सामना गाढण्याशी ही शेवटची संधी असेल. भारताला वर्ल्ड टेस्टच चॅम्पियनशीचा अंतिम सामना खेळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत चोथा कसोटी सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघावर अधिकचा दबाव असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी