31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरक्रीडाभारतीय फलंदाज पुन्हा एकदा फेल, बांग्लादेश विरुद्धचा डाव 186 धावांत आटोपला

भारतीय फलंदाज पुन्हा एकदा फेल, बांग्लादेश विरुद्धचा डाव 186 धावांत आटोपला

ढाका येथे खेळल्या जात असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने अप्रतिम गोलंदाजी करताना टीम इंडियाला 186 धावांत रोखले. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने अप्रतिम गोलंदाजी करताना पाच विकेट्स आपल्या नावावर केल्या.

ढाका येथे खेळल्या जात असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने अप्रतिम गोलंदाजी करताना टीम इंडियाला 186 धावांत रोखले. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने अप्रतिम गोलंदाजी करताना पाच विकेट्स आपल्या नावावर केल्या. भारताकडून या सामन्यात केएल राहुलने 73 धावा केल्या. राहुलशिवाय एकही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. आता बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 187 धावा कराव्या लागणार आहेत. या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय फलंदाज फेल झाल्याचे दिसून आले त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघावर टीकेची झोड उठली आहे.

बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN) नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज फ्लॉप ठरले. त्याचवेळी, केएल राहुलने विकेट पडण्याच्या दरम्यान महत्त्वपूर्ण खेळी केली. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने शानदार गोलंदाजी केली. त्याने पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि भारताला 186 धावांत रोखले.

हे सुद्धा वाचा

प्रियकरासाठी पतीची स्लो पॉयझन देऊन हत्या, मुंबई पोलिसांकडून प्रकार उघडकीस

‘हर हर महादेव’ चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास… संभाजीराजे आक्रमक

दोन जुळ्या बहिनींचा एकाच मुलाशी विवाह, आगळ्या-वेगळ्या नात्याची सर्वत्र चर्चा

राहुलला कोणाचीही साथ मिळाली नाही
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ सुरुवातीपासूनच बांगलादेशी गोलंदाजांसमोर झुंजताना दिसला.या सामन्यात भारताकडून फक्त केएल राहुलने 70 चेंडूत 73 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. मात्र, राहुलला अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाची साथ मिळाली नाही. त्यामुळे संघाला मनस्ताप सहन करावा लागला. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि इबादत हुसेन या अनुभवी अष्टपैलू खेळाडूंनी अप्रतिम गोलंदाजी केली. या सामन्यात शाकिबने 5 तर इबादतने 4 विकेट घेतल्या.

शाकिबसमोर फलंदाज अपयशी ठरले
बांगलादेशचा अनुभवी स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत भारताच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विशेषतः टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि या दौऱ्यावर पुनरागमन करणारा अनुभवी फलंदाज विराट कोहली यांना त्यांच्या एकाच षटकात शकीनने बाद केले. एका षटकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची विकेट घेण्याची शाकिबच्या कारकिर्दीतील ही दुसरी वेळ होती. शकीबच्या बळावर भारताचा डाव केवळ 186 धावांपर्यंतच मर्यादित राहिला. आता बांगलादेशला विजयासाठी 187 धावा कराव्या लागणार आहेत. आता या सामन्यात भारताचे गोलंदाज कशी गोलंदाजी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!