31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeक्रीडाआयपीएल 2025: आरसीबीमध्ये दाखल झाले डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेंट बोल्ट

आयपीएल 2025: आरसीबीमध्ये दाखल झाले डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेंट बोल्ट

दिल्ली कॅपिटल्सचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि राजस्थान रॉयल्सचा माजी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांच्या नावाचाही समावेश आहे. (IPL 2025 David Warner and Trent Boult join RCB)

भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी त्याच्या यूट्यूब चॅनेलवर मॉक ऑक्शन आयोजित केले होते. ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर फ्रँचायझीने त्यांच्या संघात अनेक नवीन नावांचा समावेश केला होता. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि राजस्थान रॉयल्सचा माजी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांच्या नावाचाही समावेश आहे. (IPL 2025 David Warner and Trent Boult join RCB)

BCCI चे नवीन सचिव होणार नाही रोहन जेटली, जाणून घ्या कारण

आर अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर झालेल्या मॉक ऑक्शनमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेंट बोल्ट यांनी आरसीबीमध्ये प्रवेश केला. आरसीबीने वॉर्नरसाठी 5 कोटी रुपये खर्च केले, तर ट्रेंट बोल्टला 13.50 कोटी रुपयांना खरेदी केले. त्यानंतर वॉर्नरकडे विराट कोहलीचा आरसीबीचा जोडीदार म्हणून पाहिले जात आहे. खरेतर, मेगा लिलावापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना सोडले. त्यानंतर आता फ्रँचायझीला सलामीवीर आणि वेगवान गोलंदाजाची गरज आहे. (IPL 2025 David Warner and Trent Boult join RCB)

अंपायरसोबत पंगा घेणे या खेळाडूला पडले महागात, ICC ने केली मोठी कारवाई

डेव्हिड वॉर्नर गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. त्याआधी वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादकडून क्रिकेट खेळून संघाला विजेतेपदापर्यंत नेले होते. विशेष बाब म्हणजे आयपीएलमध्ये वॉर्नरने आरसीबीविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. आरसीबीविरुद्ध फलंदाजी करताना वॉर्नरने आतापर्यंत 985 धावा केल्या आहेत. पण मॉक ऑक्शनमध्ये हा खेळाडू आरसीबीकडे जाताना दिसला. (IPL 2025 David Warner and Trent Boult join RCB)

याशिवाय मॉक ऑक्शनमध्ये आरसीबीने व्यंकटेश अय्यरला दुसरा सर्वात महागडा खेळाडू म्हणून विकत घेतला. आरसीबीने अय्यरसाठी मॉक ऑक्शनमध्ये 12 कोटी रुपये खर्च केले. याशिवाय विल जॅकला पुन्हा 7.5 कोटी रुपयांना आरसीबीने खरेदी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी