आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. आता मेगा लिलावाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्याचं कारण होतं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पर्थ कसोटी सामना. मेगा लिलावाच्या प्रसारकांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) विनंती केली आहे. (ipl 2025 mega auction time changed)
IPL 2025 : या दिवशी सुरु होणार जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग
मेगा लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर होणार आहे. यापूर्वी या कार्यक्रमाची वेळ भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता ठेवण्यात आली होती. आता प्रसारकांच्या विनंतीनंतर या कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता खेळाडूंवरील बोली 3 वाजता नाही तर 3:30 वाजता दिसणार आहे. (ipl 2025 mega auction time changed)
आयपीएल 2025: आरसीबीमध्ये दाखल झाले डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेंट बोल्ट
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना आणि IPL 2025 च्या मेगा लिलावामुळे डिजनी प्लस हॉटस्टारला सर्वाधिक फटका बसला असता. त्यांनी आयपीएल 2025 लिलावासाठी टीव्ही हक्क आणि भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी डिजिटल आणि टीव्ही हक्क मिळवले आहेत. गेल्या काही वर्षांत, आयपीएल लिलाव हा एक कार्यक्रम बनला आहे आणि लाखो लोक ते पाहण्यासाठी येतात. (ipl 2025 mega auction time changed)