IPL 2025 मेगा लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने फिल सॉल्ट, भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पंड्या सारख्या अनेक महान खेळाडूंना खरेदी केले. मात्र, त्याआधी संघाने आपला कर्णधार फाफ डू प्लेसिसला सोडले होते. यानंतर आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की नवीन हंगामात आरसीबीचा पुढचा कर्णधार कोण असेल? (ipl 2025 rcb new captain krunal pandya)
विराट कोहलीला रूटपेक्षा सरस म्हणणे माजी कांगारू प्रशिक्षकाला पडले महाग
विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचा कर्णधार बनू शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे, मात्र फ्रँचायझीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर आरसीबीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नवीनतम पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर चाहत्यांना वाटते की कृणाल पांड्या आरसीबीचा नवा कर्णधार होऊ शकतो. (ipl 2025 rcb new captain krunal pandya)
View this post on Instagram
हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली जाईल चॅम्पियन्स ट्रॉफी
आरसीबीने इंस्टाग्रामवर क्रुणाल पांड्याचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये पांड्या आरसीबीच्या जर्सीत दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “टॉप ‘के’ येथे आहे, पांड्याकडे आभा आहे. तुम्ही आधीच यांना ओळखत आहे.” (ipl 2025 rcb new captain krunal pandya)
मेगा लिलावात कृणाल पांड्याला आरसीबीने 5.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते, त्यानंतर चाहतेही या खेळाडूकडे आरसीबीचा नवा कर्णधार म्हणून पाहत आहेत. तर क्रुणाल पंड्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोदा संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. याआधी क्रुणाल आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत होता. (ipl 2025 rcb new captain krunal pandya)
यावेळी आरसीबीने मेगा लिलावात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारवरही विश्वास व्यक्त केला आहे. भुवनेश्वरला आरसीबीने 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अशा परिस्थितीत आरसीबीचा नवा कर्णधार म्हणून भुवनेश्वर कुमारकडेही पाहिले जात आहे. भुवीने याआधी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे 8 सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे, आता नव्या सत्रात आरसीबी ही मोठी जबाबदारी कोणाला देते हे पाहायचे आहे. (ipl 2025 rcb new captain krunal pandya)