आयपीएल 2025 च्या मेगा लिलावासाठी सर्वेच लोक उत्साही आहे. लिलावापूर्वी सर्व 10 फ्रँचायझी आपल्या संघात कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार आहेत हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींना 31 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांची खेळाडूची यादी प्रसिद्ध करायची आहे, तसेच, यंदा आयपीएलमध्ये खूप मोठे बदल होणार आहे. यामुळे ऋषभ पंत, केएल राहुलसारख्या स्टार क्रिकेटपटूंचे काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. (ipl 2025 retention watch online)
केवळ 3 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून उघडले ‘या’ खेळाडूचे नशीब
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनेही यंदा रिटेन्शन नियम अपडेट केले आहेत. संघ आता जास्तीत जास्त सहा खेळाडू ठेवू शकतात, ज्यामध्ये कमाल पाच कॅप्ड आणि दोन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. एका विशेष नियमानुसार, कॅप्ड खेळाडूंनी गेल्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नसेल तर त्यांना अनकॅप्ड म्हणून कायम ठेवता येते. या नियमामुळे चेन्नई सुपर किंग्समध्ये महेंद्रसिंग धोनी यांची राहण्याची पूर्ण आशा आहे. (ipl 2025 retention watch online)
RCBच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, IPL 2025 मध्ये संघाचे नेतृत्व करणार विराट कोहली!
नवीन नियमांव्यतिरिक्त, लिलाव पर्समध्ये देखील 20% वाढ करण्यात आली आहे. आता सर्वच संघांकडे खर्च करण्यासाठी 120 कोटी रुपये आहेत. इतकेच नाही तर पगाराची मर्यादा 146 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. (ipl 2025 retention watch online)
IPL 2025 राखण्याची अंतिम मुदत कधी आहे?
-IPL 2025 राखण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:00 आहे.
कोणते टीव्ही चॅनल आयपीएल 2025 रिटेंशन प्रसारित करेल?
-IPL 2025 रिटेंशन भारतात स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स18 नेटवर्कवर थेट प्रसारित केले जाईल. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:00 वाजता अधिकृत प्रसारण सुरू होईल.
IPL Retention 2025 चे लाइव्ह स्ट्रीमिंग कसे पहावे?
-IPL 2025 Retention चे लाइव्ह स्ट्रीमिंग 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30 पासून JioCinema ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.