लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका आयपीएल 2024 दरम्यान केएल राहुलवर आक्रोश केल्यामुळे चर्चेत आहेत. यावेळी एलएसजीने मेगा लिलावात सर्वाधिक रक्कम खर्च करून ऋषभ पंतला खरेदी केले आहे. LSG ने पंतला 27 कोटींना विकत घेतले आहे. आता LSG चे मालक संजीव गोयंका यांनी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल पॉडकास्ट दरम्यान एक मोठे विधान केले आहे. (ipl 2025 sanjiv goenka statement ms dhoni)
‘त्याचे वजन जास्त आहे…’ माजी क्रिकेटपटूने रोहित शर्माच्या फिटनेसवर उपस्थित केला प्रश्न
टीआरएस पॉडकास्टवर बोलताना संजीव गोयंका म्हणाले, “तुम्ही एमएस धोनीकडे पहा, मी त्याच्यासारखा लीडर पाहिला नाही. त्याची विचारसरणी आणि दृष्टीकोन, या वयात माणूस स्वत:ला कसा नव्याने शोधू शकतो. पाथिराना पहा, तो एक तरुण गोलंदाज आहे, धोनीने त्याला मारक मॅचविनर बनवले आहे. आपल्या खेळाडूंचा कधी आणि कसा वापर करायचा हे त्याला माहीत आहे आणि त्यानुसार विचार करतो. (ipl 2025 sanjiv goenka statement ms dhoni)
स्मृती मानधनाने रचला इतिहास, असा विक्रम करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू
संजीव गोयंका पुढे म्हणाले, “जेव्हा मी त्यांच्याशी बोलतो तेव्हा मला काहीतरी शिकायला मिळते. लखनौ विरुद्ध चेन्नई सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. माझा एक 11 वर्षांचा नातू आहे ज्याला क्रिकेटचे वेड आहे. धोनीने त्याला 5-6 वर्षांपूर्वी माझ्या घरी क्रिकेट खेळायला शिकवले होते. तो त्याला प्रश्न विचारत राहिला आणि मी माझ्या नातवाला सांगायचो, ‘आता त्याला सोड’. धोनीने उत्तर दिले, ‘ते सोडा, मी या संवादाचा आनंद घेत आहे.’ (ipl 2025 sanjiv goenka statement ms dhoni)
एमएस धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. चेन्नईने एमएस धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली CSK ने पाच वेळा IPL चे विजेतेपद पटकावले आहे. (ipl 2025 sanjiv goenka statement ms dhoni)