2024 वर्ष संपत आला असून आता चाहत्यांना पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या हंगामाची उत्सुकता आहे. आजकाल सर्वीकडे फक्त आयपीएल 2025 आणि मेगा ऑक्शनची नावे आहेत. दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या या लीगची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पुढील वर्षी ही स्पर्धा 14 मार्च ते 25 मे दरम्यान खेळवली जाईल. पुढील वर्षीच नाही तर 2026 आणि 2027 च्या हंगामाच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. आयपीएल 2026 ची सुरुवात 15 मार्चपासून होणार, तर शेवटचा सामना 31 मे रोजी होईल. याशिवाय, 2027 मध्ये, ही लीग 14 मार्चपासून सुरू होईल आणि 30 मे पर्यंत चालेल. (ipl 2025 start 14th march to 25th may)
आयपीएल 2025: आरसीबीमध्ये दाखल झाले डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेंट बोल्ट
आयपीएल 2025 च्या मोसमात गेल्या तीन हंगामाप्रमाणे 74 सामने खेळवले जातील. बहुतेक पूर्ण सदस्य देशांतील परदेशी खेळाडूंना त्यांच्या बोर्डाकडून पुढील तीन हंगामांसाठी आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे. यामध्ये पाकिस्तानचा समावेश नाही, ज्यांच्या खेळाडूंना 2008 पासून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. (ipl 2025 start 14th march to 25th may)
BCCI चे नवीन सचिव होणार नाही रोहन जेटली, जाणून घ्या कारण
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खेळाडूंना IPL 2025 मध्ये खेळण्यास मान्यता दिली आहे. तथापि, 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे, जी 18 मार्चपूर्वी संपेल असा खुलासा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केला आहे. (ipl 2025 start 14th march to 25th may)
DATES FOR IPL FROM ESPN CRICINFO:
IPL 2025: March 14 – May 25.
IPL 2026: March 15 – May 31.
IPL 2027: March 14 – May 30. pic.twitter.com/Wx6sW7hl4U— Johns. (@CricCrazyJohns) November 22, 2024
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल 2026 मध्ये सामील होतील. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) 18 केंद्रीय करार प्राप्त केलेल्या खेळाडूंची यादी देखील सादर केली आहे जे पुढील तीन हंगामांसाठी उपलब्ध असतील. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडूही पुढील तीन हंगामांसाठी पूर्णपणे उपलब्ध असतील. (ipl 2025 start 14th march to 25th may)
पुढील वर्षीच्या आयपीएल 2025 पूर्वी, 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे मेगा लिलाव होणार आहे. यामध्ये ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूंचे भवितव्य पणाला लागले आहे. या मेगा लिलावात एकूण 574 खेळाडू सहभागी होणार आहेत. 574 खेळाडूंपैकी 366 भारतीय आणि 208 परदेशी आहेत, त्यात सहयोगी देशांतील 3 खेळाडूंचा समावेश आहे. (ipl 2025 start 14th march to 25th may)