27.6 C
Mumbai
Monday, February 10, 2025
Homeक्रीडा23 मार्चपासून सुरु होणार आयपीएल 2025, यादिवशी खेळला जाणार शेवटचा सामना

23 मार्चपासून सुरु होणार आयपीएल 2025, यादिवशी खेळला जाणार शेवटचा सामना

मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजीव शुक्ला यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या आवृत्तीच्या तारखांची पुष्टी केली. (IPL 2025 will start from March 23)

आयपीएल 2025 ला घेऊन मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, 23 मार्चपासून आयपीएल 2025 सुरू होईल. तर त्याचा अंतिम सामना 25 मे रोजी खेळला जाईल. मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजीव शुक्ला यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या आवृत्तीच्या तारखांची पुष्टी केली. (IPL 2025 will start from March 23)

घटस्फोटाच्या बातमीत युजवेंद्र चहलला बसला आणखी एक धक्का

यावेळी आयपीएल 2025 च्या आधी मेगा लिलाव झाला. यंदा ऋषभ पंत आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला. त्याला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना खरेदी केले. (IPL 2025 will start from March 23)

IPL 2025 चा पहिला सामना खेळणार नाही हार्दिक पांड्या, जाणून घ्या कारण

तर कोलकाता नाईट रायडर्सना आयपीएलची ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. याचबरोबर तो लीगच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू बनला. व्यंकटेश अय्यरला केकेआरने 23.75 कोटी रुपयांना खरेदी केले. (IPL 2025 will start from March 23)

याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या निवडीबाबत एक अपडेट देखील समोर आला आहे.राजीव शुक्ला म्हणाले की, पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या निवडीबाबतची बैठक 18 किंवा 19 जानेवारी रोजी होईल. आतापर्यंत इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश या तीन संघांनी या स्पर्धेसाठी आपले संघ जाहीर केले आहेत. (IPL 2025 will start from March 23)

या बैठकीत देवजीत सैकिया आणि प्रभतेज सिंग भाटिया यांची बीसीसीआयचे नवीन सचिव आणि कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या पदांसाठी फक्त देवजीत सैकिया आणि प्रभतेज सिंग भाटिया यांनीच अर्ज दाखल केले होते. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. (IPL 2025 will start from March 23)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी