19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होणार आहे. त्याआधी भारताला इंग्लंडसोबत एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची आहे. मात्र या मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळू शकणार नाही अशी शक्यता आहे. बुमराह सिडनी येथील सामन्यात पाठीच्या दुखण्याने त्रस्त दिसला होता. त्यामुळे त्याला सध्या विश्रांती देऊन पुढल्या महिन्यात सुरु होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयार होण्याची संधी दिली जाऊ शकते. (jasprit bumrah injury india vs england)
सिडनी मालिकेत रोहित शर्मा खेळणार की नाही? मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने दिले उत्तर
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला. बुमराह 32 विकेट्स घेत भारताचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. पाठीच्या दुखण्यामुळे 30 वर्षीय खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. पाच सामन्यांच्या या मालिकेत त्याने 150 पेक्षा जास्त षटके टाकली. (jasprit bumrah injury india vs england)
बुमराहला जास्त कामाच्या ओझ्यामुळे दुखापत झाली आहे आणि बीसीसीआयचा वैद्यकीय संघ प्रयत्न करणार कि तो आयसीसी प्रमुख स्पर्धेसाठी तयार असणार. बुमराहच्या उपस्थितीवर या स्पर्धेतील भारताची कामगिरी मुख्यत्वे अवलंबून असेल. (jasprit bumrah injury india vs england)
सिडनी कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने केले मोठे विधान
या प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, बुमराहच्या पाठीच्या दुखापतीचा दर्जा अद्याप कळलेला नाही. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेला बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारीला दुबईत सुरुवात करेल. जर बुमराहची दुखापत ग्रेड वन श्रेणीत असेल, तर त्याला खेळात परत येण्यापूर्वी किमान तीन आठवडे पुनर्वसनात घालवावे लागतील. ग्रेड दोनच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी सहा आठवडे लागू शकतात, तर ग्रेड तीनची दुखापत, गंभीर मानली जाते, यासाठी किमान तीन महिने विश्रांती आणि पुनर्वसन आवश्यक असते. (jasprit bumrah injury india vs england)
यंदा या फॉरमॅटचा वर्ल्ड कप नसल्यामुळे बुमराह इंग्लंडविरुद्ध द्विपक्षीय टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार नाही हे जवळपास निश्चित झाले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी पाहता, तो इंग्लंडविरुद्ध तीनपैकी किमान दोन एकदिवसीय सामने खेळेल अशी अपेक्षा होती. (jasprit bumrah injury india vs england)
आता मात्र त्याच्या दुखापतीची तीव्रता त्याला इंग्लंडविरुद्धच्या 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळता येईल की नाही हे ठरवेल. या मालिकेतील शेवटचा सामना 12 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. भारत 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होणार आहे. (jasprit bumrah injury india vs england)