30 C
Mumbai
Monday, May 22, 2023
घरक्रीडाभारताचा आणखी एक क्रिकेटपटू निवृत्ती घेणार

भारताचा आणखी एक क्रिकेटपटू निवृत्ती घेणार

झुलन गोस्वामीने ( Jhulan Goswami ) सन २०१८ मध्ये २०० बळींचा आकडा ओलांडला आहे. हा विक्रमी आकडा गाठणारी झुलन जगातील पहिली व एकमेव महिला गोलंदाज आहे.

भारताच्या पुरूष क्रिकेट संघाने जगभरात आपला नावलौकीक संपादन केलेला आहे. पण पुरूषांप्रमाणेच भारतीय महिला क्रिकेट संघानेही अलिकडे उत्तम कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळेच महिला क्रिकेट संघालाही आता ग्लॅमर प्राप्त झाले आहे. महिला संघाला ग्लॅमर प्राप्त करून देणाऱ्या कर्णधार मिताली राज हिने नुकतीच निवृत्ती पत्करली आहे. मिताली इतकेच तोलामोलाचे योगदान देणारी झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) ही आणखी एक खेळाडू आहे. ती सुद्धा आता महिला क्रिकेट संघातून निवृत्त होणार आहे. सलग दोन दशके झुलन गोस्वामीने खडतर परिश्रम घेवून भारतीय महिला संघाला उंची मिळवून देण्यात योगदान दिले आहे.

पुढील महिन्यात इंग्लंड विरोधात भारतीय संघ तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडमध्येच ही मालिका खेळली जाणार आहे. झुलन गोस्वामीसाठी ही शेवटची मालिका असेल. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस् मैदानावर २४ सप्टेंबर रोजी झुलन आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळेल. निरोपाचा सामना म्हणून झुलनचे चाहते या सामन्याकडे पाहात आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यामध्ये झुलनचा समावेश भारतीय संघात करण्यात आला नव्हता. तेव्हाच तिच्या निवृत्तीच्या चर्चेला सुरूवात झाली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) हवाल्याने ANI या वृत्तसंस्थेने झुलन गोस्वामीच्या संभाव्य निवृत्तीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

झुलन गोस्वामीने सन २०१८ मध्ये २०० बळींचा आकडा ओलांडला आहे. हा विक्रमी आकडा गाठणारी झुलन जगातील पहिली व एकमेव महिला गोलंदाज आहे. पश्चिम बंगालमधील छकदहा (जि. नाडीया) या छोट्याशा गावची झुलन ही रहिवाशी आहे. ६ फेब्रुवारी २००२ मध्ये तिने आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटमध्ये पहिले पाऊल टाकले. चेन्नई येथे इंग्लंड विरूद्ध झालेल्या सामन्यात तिला पहिली संधी मिळाली होती. नंतर तिने या संधीचे सोने करून दाखविले, अन् देशाचे नाव सतत उंचविण्याची कामगिरी तिने केली.

साधारण २० वर्षांच्या कारकिर्दीत झुलन गोस्वामी एकूण १६६ एकदिवसीय सामने खेळली आहे. यांत तब्बल चार विश्वचषक मालिकांचाही समावेश आहे. सन २०१७ च्या विश्वचषक सामन्यात भारताने अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यात झुलनने चांगली कामगिरी केली होती.

भारतीय संघ इंग्लंडच्या विरोधात पुढील महिन्यात प्रत्येकी तीन एकदिवसीय व टि२० सामने खेळणार आहे. १८, २१ व २४ सप्टेंबर रोजी एकदिवसीय, तर १०, १३ व १५ सप्टेंबर रोजी टि२० सामने खेळले जाणार आहेत. यातील दिवसीय संघामध्ये झुलन गोस्वामी समावेश केला आहे.

एकदिवसीय सामन्यासाठीचा भारतीय महिला संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), शेफाली वर्मा, एस. मेघना, दिप्ती शर्मा, यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), पुजा वसत्रकर, स्नेह राणा, रेणूका सिंग, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), हर्लिन देओल, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादूर, झुलन गोस्वामी, जेमिमा रॉड्रिग्ज.

टि२० सामन्यासाठीचा भारतीय महिला संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), दिप्ती शर्मा, पुजा वसत्रकार, स्नेह राणा, रेणुका सिंग, मेघना सिंग, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, दयालन हेमलता, शेफाली वर्मा, सिमरन दिल बहादुर, रिचा घोष (यष्टीरक्षक), एस. मेघना, जेमिमा रॉड्रिग्ज, किरण प्रभू नवगिरे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी