28 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरक्रीडाशालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरु करण्याची कप‍िल पाटील यांची दीपक केसरकर यांच्याकडे...

शालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरु करण्याची कप‍िल पाटील यांची दीपक केसरकर यांच्याकडे मागणी

शालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरु करण्याची आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शिक्षण सचिव यांना आज पत्र पाठविण्यात आल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

शालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरु करण्याची आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शिक्षण सचिव यांना आज पत्र पाठविण्यात आल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली. कोविड 19 च्या प्रादूर्भावामुळे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षांमध्ये तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील शालेय क्रीडा स्पर्धा बंद होत्या. शाळा बंद ठेवण्याचे शासनाने आदेश दिले होते. त्यामुळे या क्रीडा स्पर्धा बंद होत्या. या निर्बंधांमुळे महाराष्ट्रातील खेळाडूंचे मोठे नुकसान झाले आहे.

या वर्षी शाळा नियमीत पणे सुरु आहेत, त्यामुळे क्रीडा स्पर्धापूर्वी प्रमाणे घेता येऊ शकणार आहेत. मात्र शासनाकडून आदेश न आल्यामुळे क्रीडा स्पर्धा भरवता येत नाहीत. शिवाय या वर्षी शाळा सुरु झाल्या. त्या नंतर सरकारमध्ये अभूतपूर्व अशी उलथा पालथ झाली. त्यामुळे राज्याला शिक्षणमंत्रीच नव्हते. त्यामुळे हा निर्णय घेता आला नाही. दोन वर्षांपासून शालेय स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील खेळाडू खेळापासून वंचित आहेत.

हे सुद्धा वाचा

Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांचा ‘ऐक’ नाथ होऊ नये,धनंजय मुंडेंची कोपरखळी !

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे लवकरच राज्यभर ‘महाप्रबोधन’

Konkan : अबब ! कोकणच्या रस्त्यांची भयानक चाळण !

राज्यातील खेळाडूंना राज्य आणि देश पातळीवर संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. भारतीय शालेय खेळ महासंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे अयोजन केले जाते. त्यामुळे 2022-23 मधील शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे आहे. तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी आमदार कप‍िल पाटील आणि श‍िक्षक भारतीच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही सुभाष मोरे यांनी सांगितले.

दरवर्षी पावसाळयात शाळेमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच तालुका पातळीवर देखील क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल जाते. त्यातून राज्य पातळीवरील खेळाडूंची निवड केली जाते. आशा प्रकाराने देश पातळीवर खेळणारे मोठे खेळाडू तयार होत असतात. हे सर्व मैदानी खेळ विदयार्थ्यांना प्रोत्साहन देतात.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी