29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeक्रीडापुण्यात पार पडलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनधिकृत : कुस्तीसम्राट अस्लम काझी

पुण्यात पार पडलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनधिकृत : कुस्तीसम्राट अस्लम काझी

पुण्यात (Pune) नुकत्याच पार पडलेली ६५ महाराष्ट्र केसरी स्पर्धाच (Maharashtra Kesari Tournament) अनधिकृत असल्याचा दावा कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी (Wrestler Aslam Kazi) केला आहे. पुण्यात पार पडलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला विश्वासात न घेता भरविण्यात आल्याचा खळबळजनक दावा काझी यांनी केला आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता पून्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पैलवान सिकंदर शेख यांच्याबाबत या स्पर्धेत पंचानी चुकीचा निर्णय दिल्याची टीका देखील मोठ्याप्रमाणात झाली होती. आता ही स्पर्धाच अनधिकृत असल्याचा दावा केल्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Kesari Tournament held in Pune Unauthorized Wrestler Aslam Kazi Claims)

अस्लम काझी यांच्या दाव्यानुसार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या विश्वस्तांबाबत सध्या न्यायालयात केस सुरू आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि बाळासाहेब लांडगे हेच अद्याप कुस्तीगीर परिषदेचे प्रमुख असून त्यांच्याबाजूने न्यायालयाने निकाल दिला आहे. असे असताना पवार, लांडगे यांना रामदास तडस यांनी विश्वासात न घेता महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केल्याचे काझी यांनी म्हटले आहे.

अस्लम काझी म्हणाले, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून मार्च २०२३ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. पुण्यात झालेल्या स्पर्धेत कुस्तीगीर परिषदेला विश्वासात घेतले गेले नाही. महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यासाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची संमती आवश्यक असल्याचे देखील ते म्हणाले. पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सहभागी पैलवानांना जे प्रमाणपत्र दिले आहे त्यावर देखील शरद पवार आणि बाळासाहेब लांडगे यांचा सही शिक्का नाही. सरकारी नोकरीसाठी खेळाडूंच्या कोट्यातून नोकरी मिळविण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे पुण्यातील स्पर्धेत सहभागी खेळाडूंना जे प्रमाणपत्र दिले आहे ते नोकरीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही असे देखील अस्लम काझी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

बारामतीच्या चांडाळ चौकडीच्या करामती झाल्या वर्ल्डफेमस!

पुण्याचा शिवराज राक्षे झाला ‘महाराष्ट्र केसरी’

एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवार फोन करतात, मार्गदर्शन करतात, मी त्यांचा आभारी आहे

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, महाराष्ट्र कुस्ती फेडरेशन, भारतीय कुस्ती महासंघ याबाबत राज्यात मोठे संभ्रम निर्माण झाले आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद संस्थेत काम केलेल्या तज्ज्ञ पैलवानांनी, प्रमाणपत्रांविषयी संशय व्यक्त केलाचा दावा देखील काझी यांनी यावेळी केला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी