भारतातील आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र वर्ल्डकपमध्ये देखील तितकीच रंगत निर्माण झाली आहे. दररोजच्या सामन्यात काही ना काही ट्वीस्ट घडत आहेत. तर कधी सामने विलक्षण होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या ४९ व्या शतकाबाबत चर्चा होती. त्यानंतर श्रीलंका आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात मॅथ्यूजच्या टाईम आऊटमुळे अधिक चर्चा होती. यामुळे सुरू असलेल्या वनडे विश्वचषकाला वेगवेगळ्या चर्चांमुळे चांगली रंगत निर्माण झाली आहे. यामध्ये आणखी एका ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाची चर्चा सुरू आहे. तो फलंदाज म्हणजे ग्लॅन मॅक्सवेल आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान (७ नोव्हेंबर) या सामन्यादरम्यान त्याने २०१ धावा करत आपल्या संघाला परभवाच्या गर्तेतून बाहेर काढले आहे.
मॅक्सवेलने जगभरातील क्रिकेट रसिकांचे प्रेम जिंकले आहे. एवढेच नाही तर त्याची खेळाडूवृत्ती, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास पाहूण त्याने आपले नाव क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीले आहे. यामुळे हा वर्ल्डकप आता अस्मरणीय असणार आहे. अनेक दिवसांपासून ऑस्ट्रेलिया संघाची अवस्था ही जखमी घोड्यासारखी होती. मात्र अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने आपल्या संघाला पडत्या काळात सावरले आहे.
हे ही वाचा
धक्कादायक! पुण्यात रेल्वे पोलिसांकडूनच अल्पवयीन मुलीवर बलात्कार
भेसळ पदार्थांवर बसणार चाप; तब्बल १०७ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट
कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी अजित पवारांची काढली खरडपट्टी
आफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरोधात २९२ धावांचे लक्ष दिले होते. मात्र ९१ धावांवर ऑस्ट्रेलिया संघाचे ७ गडी बाद झाले होते. अशावेळी सर्वकाही संपल्यात जमा होते. यावेळी दुखापतग्रस्त संकटमोचन, तारणहार मॅक्सवलने १२८ चेंडूत २१ चौकार आणि १० षटकार ठोकत २०१ धावा करत भारताचे माजी दिग्गज फलंदाज कपिल देव यांचा रेकाॅर्ड मोडीत काढला होता.
𝔸ℝ𝔼 𝕐𝕆𝕌 ℕ𝕆𝕋 𝔼ℕ𝕋𝔼ℝ𝕋𝔸𝕀ℕ𝔼𝔻?#CWC23 #AUSvAFG pic.twitter.com/DtJvdAWf8r
— ICC (@ICC) November 7, 2023
कपिल देवचा रेकॉर्ड मोडीत
सामन्यादरम्यान मॅक्सवेलच्या मांड्या मोठ्या प्रमाणात दुखू लागल्या होत्या. त्याला चालता येत नसून असहाय्य वेदना होत होत्या. तरीही त्याने ‘तू फक्त उभा राह’ अशी पॅट कमिन्सला सांगितले. त्याने एका पायावर सामन्याचा भार सांभाळत कलाटणी दिली आहे. केवळ ९३ चेंडूत २०० धावा करणाऱ्या मॅक्सवेलने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. तर त्याने १९८३ च्या वर्ल्डकपमध्ये कपिल देवने केलेल्या १७५ धावांचा रेकॉर्ड देखील मोडीत काढला आहे.